अर्पित शहा, रवि साटोरे यांची आगेकूच कायम

By admin | Published: July 17, 2017 04:19 AM2017-07-17T04:19:25+5:302017-07-17T04:19:25+5:30

पीवायसी हिंदू जिमखानातर्फे आयोजित दुसऱ्या राजाभाऊ शहाडे चषक खुल्या स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत अर्पित शहा, रवि साटोरे

Arpit Shah, Ravi Satorre continued their fortunes | अर्पित शहा, रवि साटोरे यांची आगेकूच कायम

अर्पित शहा, रवि साटोरे यांची आगेकूच कायम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीवायसी हिंदू जिमखानातर्फे आयोजित दुसऱ्या राजाभाऊ शहाडे चषक खुल्या स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत अर्पित शहा, रवि साटोरे, दिक्षांत ननावरे, संतोश धर्माधिकारी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून मुख्य फेरी गाठली.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या स्पर्धेत मुंबईच्या अर्पित शहा याने पुण्याच्या इद्रिस कुरेशी याचा ७४-१४, ३६-५०, १००-१ असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. वाकड येथे राहणाऱ्या रवि साटोरे याने पुना क्लबच्या पंकज परमार याच्यावर ५६-३३, ३३-६१, ४६-३० ने सरशी साधत विजयी सलामी दिली.
साताराच्या दिक्षांत ननावरे याने पुण्याच्या यशवंत कसबे याच्यावर ३५-४४, ७८-१७, ६०-३८ असा निसटता विजय मिळवत मुख्य फेरी गाठली. डेक्कन जिमखानाच्या संतोश धर्माधिकारी याने ऋतुराज जोराग याचा ३६-६४, ५४-३०, ५४-२३ असा पराभव करून आगेकूच केली.
रणजीत नेगी, सुमित सारडुलकर, सौविक मलिक, ऋषभ गोहील, वेदांत जोशी, विवेक मेहेत्रे व शुभम रंधेयांनीही पात्रता फेरीत विजय साकारत मुख्य फेरी गाठली.
निकाल : पात्रता फेरी:
अर्पित शहा (मुंबई) वि.वि. इद्रीस कुरेशी (पुणे) ७४-१४, ३६-५०, १००-१.
रवि साटोरे (वाकड) वि.वि. पंकज परमार (पुना क्लब) ५६-३३, ३३-६१, ४६-३०;
रणजीत नेगी (वाशी) वि.वि. दिपक गलेहोत (पुणे) ७३-३९, ५५-४७.
दिक्षांत ननावरे (सातारा) वि.वि. यशवंत कसबे (पुणे) 35-44, ७८-१७, ६०-३८.
सुमित सारडुलकर (मुंबई) वि.वि. भावेश जैन (खडकी) ४१-२५, ७१-४५;
सौविक मलिक (मुंबई) वि.वि. नितेश माने (पुणे) ५७-१८, ५४-३६;
ऋषभ गोहील (मुंबई) वि.वि. सचिन तापकीर (पुणे) ६३-२६, ६६-६;
वेदांत दोशी (आरसीबीसी) वि.वि. आशिष हुले (खडकी) ५०-३४, ६१-४९.
विवेक मेहेत्रे (पुणे) वि.वि. अजिंक्य खालकर (पुणे) ५६-३१, ६२-१९.
शुभम रंधे (पुणे) वि.वि. संजय ताटके (डेक्कन जिमखाना) ५६-१२, ६१-२३.
संतोश धर्माधिकारी (डेक्कन जिमखाना) वि.वि. ऋतुराज जोराग (पुणे) ३६-६४, ५४-३०, ५४-२३.

Web Title: Arpit Shah, Ravi Satorre continued their fortunes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.