यंत्रणांनी ठेवावा समन्वय
By admin | Published: May 12, 2017 05:08 AM2017-05-12T05:08:14+5:302017-05-12T05:08:14+5:30
संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान यंत्रणांनी समन्वयाने काम करुन सुरक्षेसंदर्भात योग्य ती
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान यंत्रणांनी समन्वयाने काम करुन सुरक्षेसंदर्भात योग्य ती दक्षता घ्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिल्या. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि भाविकांची कसल्याही प्रकारची गैरसोय होवू नये याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी अधिका-यांना केले.
विधानभवन सभागृहामध्ये पालखी सोहळ्यानिमित्त राव यांनी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदीचे विश्वस्त अजित कुलकर्णी, योगेश देसाई, सरपंच सुनिता टिळेकर तसेच सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वारक-यांना आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात, मुक्कामाच्या ठिकाणी अखंडीत वीज पुरवठा करावा अशा सुचना त्यांनी केल्या. सुरक्षेच्या आणि घातपाताच्या पार्श्वभुमीवर चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सुचना पोलीस दलाला देण्यात आल्या. स्वच्छ पाणी पुरवठ्या सोबतच, वैद्यकीय सोयी, रूग्णवाहिका, अग्निशामक यंत्रणा, मोबाईल कनेक्टिव्हीटीबाबत सर्व विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असेही त्यांनी अधिका-यांना सांगितले.
श्रीक्षेत्र आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे १७ जूनला आणि श्रीक्षेत्र देहूगाव येथून संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचे १६ जूनला आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. दोन्ही तीर्थक्षेत्री सोहळ्याच्या तयारी बाबत आढावा बैठका झाल्या आहेत.