पैशासाठी लग्न ठरवले; आता लग्नाचा विषय काढला तर मारून टाकीन, तरुणाची धमकी

By रोशन मोरे | Published: April 26, 2023 04:43 PM2023-04-26T16:43:06+5:302023-04-26T16:43:53+5:30

लग्न ठरवून कर्ज फेडण्यासाठी तरुणीला सहा लाखाचे कर्ज काढण्यास सांगितले

arranged marriage for money If the topic of marriage is brought up now I will kill you, the young man threatens | पैशासाठी लग्न ठरवले; आता लग्नाचा विषय काढला तर मारून टाकीन, तरुणाची धमकी

पैशासाठी लग्न ठरवले; आता लग्नाचा विषय काढला तर मारून टाकीन, तरुणाची धमकी

googlenewsNext

पिंपरी : तरुणीसोबत साखरपुडा केला. तिला फिरायला नेण्याच्या बहाण्याने भावी पतीने तरुणीवर अत्याचार केला. तिच्या सोबत वारंवार शारिरीक संबंध ठेवले. शेअर मार्केटमध्ये झालेले कर्ज फेडण्यासाठी तरुणीला सहा लाखाचे कर्ज काढण्यास सांगितले. तरुणीने तिच्या नावे कर्ज काढून दिले. मात्र, पैसे मिळल्यानंतर फक्त पैशासाठी तुझ्यासोबत लग्न ठरवले होते. आता तुझ्यासोबत लग्न करणार नाही, परत लग्नाचा विषय काढला तर मारून टाकीन, अशी धमकी दिली. ही घटना नऊ एप्रिल २०२२ पासून महाबळेश्वर, नानापेठे, संत तुकाराम नगर येथे घडली. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणीने पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.२५) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तरुणीसोबत साखरपुडा केलेला तरुण आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा साखरपुडा आरोपीसोबत झाला होता. त्यामुळे फिरायला देण्याच्या बहाण्याने अत्याचार केला. तसेच फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारिरीक संबंध ठेवले. आरोपीचे वडिल यांनी देखील फिर्यादीचा विश्वास संपादन करून आपल्या मुलाने शेअरमार्केट करिता घेतलेले पैसे फेडण्यासाठी फिर्यादीस लोन काढण्यास भाग पाडून फिर्यादीच्या घरून ऑनलाईन पाच लाख २२ हजार रुपये घेतले. तसेच हे पैसे परत न करता फसवणूक केली. फिर्यादीसोबत किरकोळ कारणावरून भांडण केले. तसेच त्यांच्या मुलाने पैसे घेण्यासाठीच लग्न जमवले होते. मी तुझ्याशी लग्न करणार नाही, जर पैसे मागायला आली तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी धमकी देत शिविगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: arranged marriage for money If the topic of marriage is brought up now I will kill you, the young man threatens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.