Pune Police: पोलीस शिपाई परीक्षेसाठी तब्बल २ हजार पोलीस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 02:51 PM2021-10-04T14:51:53+5:302021-10-04T15:06:47+5:30

पोलिस आयुक्तालयातील रिक्त २१४ शिपाई पदासाठीची ५ ऑक्टोबरला होत असलेल्या लेखी परीक्षेसाठी ७९ परिक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी पोलीस सज्ज

arrangement of 2000 police officers and staff for police peon examination | Pune Police: पोलीस शिपाई परीक्षेसाठी तब्बल २ हजार पोलीस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

Pune Police: पोलीस शिपाई परीक्षेसाठी तब्बल २ हजार पोलीस अधिकारी अन् कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात पुणे पोलिस आयुक्तालयाची लेखी परीक्षा जी. एस. सॉफ्टवेअर कंपनीमार्फत राबवण्यात येणार

पुणे: पुणेपोलिसआयुक्तालयातील रिक्त २१४  शिपाई पदासाठीची ५ ऑक्टोबरला होत असलेल्या लेखी परीक्षेसाठी  ७९ परिक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी तब्बल २ हजार ७४४ पोलीस अधिका-यांसह कर्मचा-यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

पुणे पोलीस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या २१४ पोलिस शिपाई पदासाठी २०१९ मध्ये जाहिरात देण्यात आली होती.  मात्र,  कोरोनामुळे पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात करण्यात आली आहे. त्यानुसार २१४ पदांसाठी तब्बल ३९ हजार ३२३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.  पोलीस भरतीमध्ये पहिल्यांदा लेखी परिक्षा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्तालयाची
लेखी परीक्षा जी. एस. सॉफ्टवेअर कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.

परीक्षेसाठी असा आहे बंदोबस्त

अपर पोलीस आयुक्त-२, पोलीस उपायुक्त-८, सहायक पोलीस आयुक्त-१३, पोलीस निरीक्षक- ७६, एपीआय-८७, पोलीस उपनिरीक्षक-८०, कर्मचारी-२ हजार ४७८

उमेदवारांसाठी सूचना

-परीक्षेच्या वेळेत मोबाईसह इतर इले. उपकरणे बाहेर  ठेवावी लागणार
- कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक
- परीक्षेची वेळ संपल्यानंतर पर्यवेक्षकाच्या सूचनेनंतर  जागा सोडावी.
- हॉलतिकीटसह आधार, पॅन, लायसन्स, पासपोर्ट जवळ बाळगा
-  उमेदवारांनी निळे, काळे बॉलपेन वापरावे
-  परीक्षा संपल्यानंतर प्रवेशपत्र पर्यवेक्षकाकडे जमा करावे लागणार

असे करावे हॉल तिकीट डाऊनलोड

परीक्षार्थी उमेदवरांना  इमेलवर हॉल तिकिटाची लिंक पाठवली जाणार आहे. काही अडचण आल्यास ९६९९७९२२३०, ८९९९७८३७२८, ०२०-२६१२२८८० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने कले आहे.

Web Title: arrangement of 2000 police officers and staff for police peon examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.