काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी 260 बसेसची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 03:03 PM2019-12-25T15:03:21+5:302019-12-25T15:09:06+5:30

काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष बसेसची साेय करण्यात आली आहे.

Arrangement of 260 buses for citizens coming to greet Karegaon Bhima Vijay Stambha | काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी 260 बसेसची व्यवस्था

काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी 260 बसेसची व्यवस्था

googlenewsNext

पुणे : काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या साेयीसाठी 260 बसेसची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 31 डिसेंबर व 1 जानेवारी असे दाेन दिवस या बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नियाेजित वाहनतळापासून ते विजयस्तंभापर्यंत जाण्यासाठी या बसेसची व्यवस्था असेल. अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी दिली. 

राम यांच्या अध्यतेखाली वाहतुक व्यवस्थेसंदर्भात बैठक झाली त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीला महसूल विभागासह राज्य परिवहन महामंडळ तसेच पुणे महानदर परिवहन मंडळाचे अधिकारी उपस्थित हाेते.  

काेरेगाव भीमा येथील अभिवादन दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना वाहनस्थळापासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत नेण्यासाठी दि.३१ डिसेंबर २०१९ व १ जानेवारी २०२० रोजी एकूण २६० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नियोजित वाहनतळापासुन विजयस्तंभापर्यंत येणाऱ्या ग्रामस्थांची व नागरिकांची विनाशुल्क वाहतुक या बसेस करतील. त्यापैकी ६० बस दि.३१ डिसेंबर २०१९ रोजी व २०० बस दि. १ जानेवारी २०२० रोजी उपब्ध असतील, यात ३० मिनीबसचा देखील समावेश असेल, असेही नवल किशाेर राम यांनी सांगितले. नियोजित वाहनतळांची माहिती लवकरच प्रसिध्द केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली. 

Web Title: Arrangement of 260 buses for citizens coming to greet Karegaon Bhima Vijay Stambha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.