थकबाकीदारांना आता वीज नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:13 AM2021-08-13T04:13:39+5:302021-08-13T04:13:39+5:30

बारामती : कोरोनाचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. महावितरणलाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांनी वीजबिल न भरल्याने ...

The arrears no longer have electricity | थकबाकीदारांना आता वीज नाहीच

थकबाकीदारांना आता वीज नाहीच

Next

बारामती : कोरोनाचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. महावितरणलाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांनी वीजबिल न भरल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. थकबाकीदारांना वारंवार आवाहन करूनही अद्यापही बिले भरली गेली नाही. त्यामुळे महावितरणचे थकबाकीदारांचा आता शेवटची संधी दिली आहे. अन्यथा येत्या काही दिवसांतच थकबाकीदारांची वीजजोड तोडण्याचे आदेश मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी बारामती परिमंडलातील अभियंत्यांना दिले आहेत. दरम्यान, यामध्ये कृषीपंपासह सर्वच वर्गवारीतील ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे.

बारामती परिमंडलात पुण्यातील सहा तालुके आणि सोलापूर व सातारा हे दोन जिल्हे येतात. परिमंडलात एकूण २६ लाख ५६ हजार वीजग्राहक आहेत. त्यातील ७ लाख ३५ हजार ५१२ हे कृषीपंपाचे आहेत. सप्टेंबर २०२० अखेर सर्व शेतकऱ्यांकडे मिळून ८१४२ कोटींची थकबाकी होती. दरम्यान, शासनाने आणलेल्या कृषी धोरणांतर्गत दोन हजार २२१ कोटी निर्लेखित करुन सुधारित थकबाकी पाच हजार ९२० कोटी इतकी निश्चित झाली. कृषी धोरणानुसार शेतकऱ्यांनी सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रक्कम व सप्टेंबर २०२० पासूनचे चालू बिल भरले तर उर्वरित ५० टक्के थकबाकी माफ होऊन शेतकऱ्यांना जवळपास ६६ टक्केची माफी मिळते. शिवाय भरणा झालेल्या रकमेतून ३३ टक्के गावपातळीवर व ३३ टक्के जिल्हापातळीवर विजेच्या पायाभूत कामावरच खर्च होणार आहे. दरम्यान, एकूण शेतकरी ग्राहकांच्या तुलनेत केवळ १०.४२ टक्के (७६६८९) शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत १२५ कोटींची थेट माफी मिळवली आहे. या सर्व शेतकऱ्यांना महावितरणने थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानितसुध्दा केले आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी अंशत: रक्कम भरली आहे. अशा शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम तातडीने भरावी लागणार आहे. तसेच ज्यांनी आजवर योजनेचा लाभच घेतलेला नाही, त्यांनाही देय रक्कम भरावी लागेल, अन्यथा महावितरणला नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागणार आहे.

————————————————————

घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडेही एक हजार ३३८ कोटींची थकबाकी

बारामती परिमंडलात शेती वगळून असलेल्या ग्राहकांमध्येही थकबाकीचे प्रमाण वाढलेले आहे. अशा विविध वर्गवारीतील ९ लाख ४२ हजार ७८३ ग्राहकांकडे १३३८ कोटी ६२ लाख रुपये थकले आहेत. यामध्ये घरगुतीचे ८ लाख १० हजार ग्राहक असून त्यांचेकडे १८३ कोटी रुपये थकीत आहेत. साचलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने विविध पथके स्थापन केली असून, सुट्टीच्या दिवशीही वसुली मोहीम सुरू राहणार असल्याने वीजबिल भरणा केंद्रेही सुरु ठेवली जाणार आहेत. ग्राहकांनी गैरसोय टाळण्यासाठी वीजबिलांचा तातडीने भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: The arrears no longer have electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.