Pune Crime: जादूटोण्याची भीती दाखवून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भोंदुबाबाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 06:09 PM2021-12-29T18:09:10+5:302021-12-29T18:13:00+5:30

कमरेच्या खाली पांगळे करण्याची भीती घालून मांत्रिकाने केली शरीरसुखाची मागणी; भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

arrest of bhondu baba for seeking bodily pleasures for fear of witch craft crime | Pune Crime: जादूटोण्याची भीती दाखवून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भोंदुबाबाला अटक

Pune Crime: जादूटोण्याची भीती दाखवून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या भोंदुबाबाला अटक

googlenewsNext

पिंपरी :  महिलेला अश्लील व्हिडिओ पाठविला. तसेच जादूटोणा करून कमरेच्या खाली पांगळे करण्याची भीती घालून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. याप्रकरणी भोंदूबाबाला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. विलास बापूराव पवार ऊर्फ महाराज (वय ४१, रा. मु.पो. पिंपळवंडी, ता. पाटोदा, जि. बीड), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने याप्रकरणी २१ डिसेंबरला वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला कमरेच्या खाली पांगळे करण्याबाबत तिच्या पतीने सांगितले असल्याचे आरोपीने फोनवरून महिलेला सांगितले. महिलेच्या पोटात दोन ते तीन गाठी असून त्यांचे आयुष्य थोडेसे राहिले आहे, असे सांगून आरोपीने महिलेला वारंवार फोन करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ज्या माणसाच्या उजव्या हाताचे तळहातावर व गुप्तांगावर तीळ आहे त्याच्याशी तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तर तुम्हाला कोणीही काही करू शकरणार नाही, असे आरोपीने महिलेला सांगितले.

त्यानंतर त्याने स्वत:चा एक अश्लिील व्हीडीओ पाठविला. व्हिडिओमध्ये त्याच्या उजव्या हातावरील व गुप्तांगावरचे तीळ दाखवले. त्यानंतर पुन्हा कॉल करून महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. माझ्याशी शरीरसंबंध ठेवले तर तुमचे सगळे कुटूंब सुखी राहील. तुम्हाला तुमचे कुटूंब सुखी ठेवायचे असेल तर माझ्याशी शरीरसंबंध ठेवा, असे म्हणून शरीरसुखाची मागणी करून आरोपीने पीडित महिलेचा विनयभंग केला. वाकड पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या मदतीने २५ डिसेंबरला आरोपीला पकडण्यसाठी डांगे चौक येथे सापळा लावला. आरोपी डांगे चौकात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहाय्यक निरीक्षक अभिजीत जाधव, संतोष पाटील, उपनिरीक्षक गणेश तोरगल, पोलीस कर्मचारी बिभीषण कन्हेरकर, दीपक साबळे, दीपक भोसले, भास्कर भारती, कल्पेश पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: arrest of bhondu baba for seeking bodily pleasures for fear of witch craft crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.