सायकल चोरणाऱ्याला अटक, पोलीस प्रशासनाला वाढतेय डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 02:38 AM2018-11-11T02:38:43+5:302018-11-11T02:40:18+5:30
स्मार्ट सिटी योजना : वाहनचोरी रोखण्यात पोलिसांना यश
पुणे : पुणे शहरातून दररोज साधारण ८ ते १० वाहने चोरीला जातात़ त्यामध्ये दुचाकींबरोबरच चारचाकींचाही समावेश असतो़ वाहनचोरी रोखण्यामध्ये पोलिसांना यश येत नसले, तरी त्याबाबत पोलीस फारसे गंभीर नसतात़ पण, स्मार्ट सिटी योजनेतील एक सायकलचोरीची फिर्याद मिळाल्यानंतर, कोंढवा पोलिसांनी ती गांभीर्याने घेऊन सायकलचोराला पकडले़ त्याच्याकडून सायकलही जप्त करण्यात आली आहे़
महादेव विजयकुमार मुनळे (वय १९, रा. कृष्णानगर, महंमदवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत, सायकल पुरवठा करणाºया कंपनीचे व्यवस्थापक आदर्श केदारी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, उपनिरीक्षक संतोष शिंदे, हवालदार राजस शेख, शिंदे, अमित साळुंके, पृथ्वीराज पांडुळे, योगेश कुंभार, अजीम शेख आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी कोंढवा भागात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी रिजवान नईम मेमन (वय १९, रा. सुंदर विहार सोसायटी, मिठानगर, कोंढवा खुर्द) याला
ताब्यात घेतले. अटकेत असलेल्या मेमनने घरफोडीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. ५९ हजारांची रोकड जप्त केली.
२,५०० सायकली स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उपलब्ध
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात २,५०० सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सायकलींना जीपीएस यंत्रणा लावण्यात आलेली आहे. सायकल वापरणाºयांकडून प्रतिमहा ९९ रुपये भाडे आकारण्यात येते. शहराच्या मध्य भागातून एक सायकल चोरीला गेली होती. याबाबतची तक्रार कोंढवा पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. जीपीएस यंत्रणा, तसेच कंपनीकडे नोंद असलेल्या मोबाईल क्रमांकावरून मुनळे याचा पोलिसांकडून माग काढण्यात आला. मुनळेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक सायकल जप्त करण्यात आली आहेत.