भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी यांच्या अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 03:30 PM2019-12-23T15:30:52+5:302019-12-23T15:38:30+5:30

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजींना अटक करावी अशी मागणी भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीने केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 जानेवारी रोजी पेरणे येथील भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून त्यासंबंधी माहिती देण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Arrest Sambhaji Bhide Guruji, Demand by Bhima Koregaon Vijayastambha shaurya samiti | भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी यांच्या अटकेची मागणी

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी यांच्या अटकेची मागणी

googlenewsNext

पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे गुरुजींना अटक करावी अशी मागणी भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीने केली. यावेळी भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जयदेव गायकवाड उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही 1 जानेवारी रोजी पेरणे येथील भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून त्यासंबंधी माहिती देण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी डंबाळे म्हणाले की, 'आम्ही आंबेडकरी जनतेच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलिसांना संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी केली होती. ती अजूनही प्रलंबित आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार घटना घडून १८ महिने झाले असून अद्यापही भिडे गुरुजी यांना ग्रामीण पोलीस प्रशासनाने साधा संपर्कही केलेला नाही. त्यामुळे त्यांना अटक करून पुढील कार्यवाही व्हावी .परंतू 1 तारखेपर्यंत त्यांना जिल्हाबंदी केली याबाबत  समाधानी आहोत. या प्रकरणी  22 एफआयआर दाखल आहेत. अट्रोसिटीच्या गुन्ह्यांमध्ये  30 दिवसात चार्जशीट दाखल करणे आवश्यक असताना दोन वर्ष उलटूनही ते झालेले नाही. पोलिसांनी केलेल्या या तपासावर आम्ही अजिबात समाधानी नाही. मागच्या सरकारच्या सुचनेनुसार गुन्हे दडवलेले आहेत. त्यामुळे हा तपास नव्याने सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली. 


राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीसाठी पाठपुरावा सुरू
भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाचे राष्ट्रीय स्मारक करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांना केले होते. याबाबत पंतप्रधान कार्यालय, सांस्कृतिक, संरक्षण विभाग, पुरातत्व विभागाशी संपर्क सुरू असून या कामाला सुरुवात झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी उंची इमारत उभी न करता ब्रिटिश वोर म्युझियम हेरिटेज धर्तीवर विकास व्हावा अशी मागणी करण्यात आली.

Web Title: Arrest Sambhaji Bhide Guruji, Demand by Bhima Koregaon Vijayastambha shaurya samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.