सुरक्षारक्षकाचा खून करणा-यास अटक, लहान मुलाच्या फोटोवरून मारेक-याची पटली ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 03:51 AM2018-02-01T03:51:41+5:302018-02-01T03:52:02+5:30
भंगार चोरी करण्यामध्ये अडथळा येऊ नये, यासाठी सुरक्षारक्षकाचा खून करणाºया एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे़
पुणे : भंगार चोरी करण्यामध्ये अडथळा येऊ नये, यासाठी सुरक्षारक्षकाचा खून करणाºया एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे़
शकील बाबू तांबोळी (वय ३५, रा़ गोकूळनगर, धानोरी, विश्रांतवाडी, पूर्वी शिवापूरवाडा, कोंढणपूर फाटा) असे त्याचे नाव आहे़ शकील तांबोळी हा पूर्वी रतन मोटर्स येथे सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता़ त्याला तेथून काढून टाकण्यात आले होते़
कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळील गुजरवाडी फाटा येथील रतन मोटर्स या शोरूममधील सुरक्षारक्षक आरिफ कासमखान पठाण (वय ५५, रा गुजरवाडी) यांच्या चेहरा आणि गळ्यावर वार करून खून केल्याचा प्रकार रविवारी दुपारी उघडकीस आला. तेथून जवळच असलेल्या एका सीसीटीव्हीमध्ये संशयितांची छायाचित्रे कैद झाली होती़ त्यावरून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी अमोल पवार व कुंदन शिंदे यांनी विविध तांत्रिक बाबींचा अभ्यास करून एका लहान मुलाचे छायाचित्र संपूर्ण कात्रज परिसरात फिरून लोकांना दाखविले़ या मुलाची ओळख पटविल्यानंतर त्यातून शकील तांबोळी यानेच हा खून केल्याचे निष्पन्न झाले़
शकील तांबोळी व त्याचे वडील या रतन मोटर्स येथे पूर्वी सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते़ गुन्हा केल्यानंतर तीन दिवस आरोपी सतत ठिकाणे बदलत होता़ हवालदार चंद्रकांत फडतरे यांना आरोपी धानोरी भागात असल्याची माहिती मिळाली़ पोलिसांनी सापळा रचून बुधवारी सकाळी त्याला पकडले़
घटनेच्या दिवशी सायंकाळी आरिफ पठाण यांचे बरोबर तांबोळीचा वाद झाला होता़ त्यानंतर त्याने एका अल्पवयीन मुलाच्या साथीने भंगार चोरीत अडथळा होऊ नये, म्हणून पठाण यांचा खून केल्याची कबुली दिली़
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, शिवदास गायकवाड, कर्मचारी चंद्रकांत फडतरे, कृष्णा निढाळकर, सचिन ढवळे, अमोल पवार, कुंदन शिंदे, प्रणव संकपाळ, उज्ज्वल मोकाशी, सरफराज देशमुख, अभिजित रत्नपारखी, महेश मंडलिक, गणेश चिंचकर, शिवदत्त गायकवाड, जगदीश खेडेकर, विनोद भंडलकर, पोलीस मित्र योगेश बळी यांनी केली आहे़
७२ तासांत गुन्हेगार ताब्यात
४कात्रज येथील रतन मोटर्समध्ये पठाण यांचा खून झाल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर, भारती विद्यापीठ पोलिसांनी अविरत परिश्रम करून सर्व तांत्रिक कौशल्याचा वापर करून ७२ तासांत गुन्हेगाराला पकडण्यात यश मिळविले़ रात्रीच्या अंधारात सीसीटीव्हीमध्ये अतिशय लांबून आणि अस्पष्ट दिसणाºया छायाचित्राचा आधार घेऊन आरोपीबरोबरच्या अल्पवयीन मुलांची ओळख पटविण्यासाठी त्यांनी संपूर्ण कात्रज परिसर पिंजून काढला़ त्यासाठी पोलीस स्टेशन स्तरावर ४ पथके तयार केली़ तांत्रिक माहितीद्वारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढून त्याला शहराच्या दुसºया टोकावरील धानोरी येथून पकडण्यात यश मिळविले़