पोटगी न देणाऱ्या पतीविरुद्ध अटक वॉरंट

By Admin | Published: April 14, 2015 01:40 AM2015-04-14T01:40:59+5:302015-04-14T01:40:59+5:30

कौटुंबिक हिंसाचाराने त्रस्त होऊन घटस्फोट घेतल्यानंतर न्यायालयाने एका महिलेला दरमहा ३ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला.

Arrest warrants against husband not giving bail | पोटगी न देणाऱ्या पतीविरुद्ध अटक वॉरंट

पोटगी न देणाऱ्या पतीविरुद्ध अटक वॉरंट

googlenewsNext

पुणे : कौटुंबिक हिंसाचाराने त्रस्त होऊन घटस्फोट घेतल्यानंतर न्यायालयाने एका महिलेला दरमहा ३ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून पतीने पोटगीची रक्कमच दिली नाही. त्यामुळे दोन मुलांना पदरात घेऊन जगणाऱ्या महिलेसाठी न्यायालयाने जप्ती वॉरंट काढले.
हडपसर येथील हिंगणेमळा येथे राहणाऱ्या पतीविरुद्ध पत्नीने कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये न्यायालयात पोटगीसाठी दाद मागितली होती. दोन्ही मुले पत्नीकडेच असतात. कौटुंबिक हिंसाचार सिद्ध झाल्याने न्यायालयाने तिला दरमहा ३ हजार रुपये पोटगी द्यावी, असा आदेश दिला होता. मात्र, पतीने न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. १२ आॅगस्ट २०१३ पासून ते १२ जानेवारी २०१५ या कालावधीची तब्बल ५१ हजार रुपये पोटगीची रक्कम झाली.
दरम्यान, पती व पोलिसांनी संगनमत करून या कारवाईकडे दुर्लक्ष करत असल्याने पोलिसांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. तरीही वसुली न झाल्याने पतीला अटक करण्याचे वॉरंट काढण्याचा अर्ज अर्जदाराच्या वतीने अ‍ॅड. चेतन भुतडा यांनी केला. न्यायालयाने अर्ज मंजूर केला आहे.
$$्निपोटगीची रक्कम वसूल करा : न्यायालय
४पत्नी अशिक्षित असल्याने उपजीविकेचे साधन नाही. त्यामुळे पोटगी वसूल करण्याचा अर्ज पत्नीने न्यायालयात केला. न्यायालयाने पतीची जंगम मालमत्ता जप्त करून १३ फेब्रुवारीपर्यंत ५१ हजार रुपये मिळवावेत किंवा त्याच्या मालमत्तेची विक्री करून रक्कम वसूल करण्यासंबंधीचा वॉरंट जारी केला. या वॉरंटची अंमलबजावणी करण्यास हडपसर पोलिसांना सांगितले आहे.

Web Title: Arrest warrants against husband not giving bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.