तरुणीचे अपहरण करत विनयभंग करणाऱ्या तरुणास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:09 AM2021-03-20T04:09:27+5:302021-03-20T04:09:27+5:30
पुणे : लग्नाच्या उद्देशाने तरुणीचे अपहरण करून तिला मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणास येरवडा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने ...
पुणे : लग्नाच्या उद्देशाने तरुणीचे अपहरण करून तिला मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणास येरवडा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. सोमेश केशव पारधे (वय २०, रा. साठेवस्ती, लोहगाव) असे पोलीस कोठडी दिलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा साथीदार बाबासोा कंधारे (रा. नाशिक) याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत १९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. १० ते १७ मार्च २०२१ दरम्यान येरवडा, नाशिक, जुन्नर या भागात ही घटना घडली. सोमेश याने पीडितेचे लग्न करण्याच्या उद्देशाने अपहरण केले. त्यानंतर तिला वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवत हाताने व झाडूने मारहाण तसेच विनयभंग केला. याखेरीज दोघांनी पीडितेला धमकी देत तिच्याकडून विविध कागदपत्रांवर सह्या करवून घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.