बनावट ई पास तयार करुन देणार्‍याला बेड्या; चुकीची कारणे देऊन १८ जणांना दिले पास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 08:17 PM2021-04-29T20:17:20+5:302021-04-29T20:17:38+5:30

लॉकडाऊन काळात जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर ई पास अत्यावश्यक करण्यात आला आहे. 

Arrested to accused who make fake e-pass; Given passes to 18 people for wrong reasons | बनावट ई पास तयार करुन देणार्‍याला बेड्या; चुकीची कारणे देऊन १८ जणांना दिले पास

बनावट ई पास तयार करुन देणार्‍याला बेड्या; चुकीची कारणे देऊन १८ जणांना दिले पास

googlenewsNext

पुणे : लॉकडाऊन जारी झाल्यानंतर अत्यावश्यक कामासाठी दुसर्‍या जिल्ह्यात अथवा दुसर्‍या राज्यात जायचे असेल तर ई पास आवश्यक करण्यात आला आहे. मात्र, हा ई पास तयार करुन घेताना चुकीची कारणे दिली अथवा अनोळखी माणसांकडून पैसे देऊन पास काढून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण पुणेपोलिसांनी अशाच प्रकारे चुकीची कारणे देऊन तब्बल १८ जणांना डिजिटल पास काढून देणार्‍यास जेरबंद केले आहे. 

धनाजी मुरलीधर गंगनमले (वय २९, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) असे त्याचे नाव आहे. 

लॉकडाऊन काळात जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर ई पास अत्यावश्यक करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके यांना एकाच लॅपटॉपवरुन अनेक ई पास येत असल्याचे लक्षात आले. धनाजी गंगनमले हा स्वत:च्या घरात वेबसाईटवरुन ई पास तयार करुन त्यामधील मजकुरामध्ये फेरफार करुन शासनाची व ई पास धारकांची फसवणूक करुन बनावट ई पास तयार करुन तो खरा असल्याचे भासवून त्यावर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो वापरुन ई पासची विक्री करीत असत्याचे आढळून आले.

पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पा चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस नाईक इरफान पठाण, निलम शिंदे, पुष्पेंद्र चव्हाण, मॅगी जाधव, गणेश पाटोळे, प्रमोद मोहिते, गणेश ढगे यांनी ही कामगिरी केली. 

सहानभुतीचा घेत होता गैरफायदा

डिजिटल पाससाठी कोविड चाचणी प्रमाणपत्र अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्यावेळी अचानक कोणाचा मृत्यु झाला तर त्यासाठी गावाला जायचे असेल तर त्यांना असे प्रमाणपत्र मिळणे शक्य नसते. याचा गैरफायदा घेऊन धनाजी गंगनमले हा लोकांना मी ई पास काढून देतो, असे सांगून त्यांच्याकडून सर्व माहिती व कागदपत्रे घेत. त्यानंतर त्यांच्या खरे कारणाऐवजी नातेवाईक मयत झाल्याचे कारण देऊन ई पास घेत असे. अशा प्रकारे त्याने चुकीची कारणे देऊन तब्बल १८ हून अधिक पास घेतले होते. तसेच त्याने ६ पास बनावट तयार केले होते. एकाच ठिकाणाहून अधिक अर्ज येत असल्याचे सेवा प्रकल्पात काम करणारे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके यांच्या लक्षात आले. त्यांनी व त्यांच्या पथकाने ज्यांना ज्यांना ई पास देण्यात आले, त्यांच्याकडे चौकशी केल्यावर धनाजी गंगनमले याची लबाडी उघडकीस आली.

Web Title: Arrested to accused who make fake e-pass; Given passes to 18 people for wrong reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.