आरोग्य विभागाच्या परीक्षेचे पेपर फोडून माहिती सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्याला औरंगाबादमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 08:36 PM2021-12-01T20:36:57+5:302021-12-01T20:37:10+5:30

परिक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली होती. या प्रकारामुळे शासनाची व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली होती.

Arrested in Aurangabad for tearing up health department exam papers and disseminating information on social media | आरोग्य विभागाच्या परीक्षेचे पेपर फोडून माहिती सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्याला औरंगाबादमधून अटक

आरोग्य विभागाच्या परीक्षेचे पेपर फोडून माहिती सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्याला औरंगाबादमधून अटक

Next

पुणे : आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेसाठी घेतलेल्या परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी सायबर पोलिसांनी बुधवारी एकाला औरंगाबाद येथून अटक केली आहे. विजय प्रल्हाद मुऱ्हाडेला (वय २९, रा. नांदी, ता. अंबड, जिल्हा. जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोग्य विभागाच्या वतीने मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. फुटलेल्या पेपरच्या स्क्रीन शॉट्समध्ये विजय मुऱ्हाडे याचे नाव होते. तांत्रिक विश्लेषणातून त्याचा मागे घेतला. या प्रकरणाचा तपास करीत पोलिसांनी त्याचा माग घेतला. त्यानंतर त्याला औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आले.

राज्य आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केली होती. या प्रकारामुळे शासनाची व परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची फसवणूक झाली होती. त्यानुसार दाखल गुन्ह्यात मुऱ्हाडे अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस हाके यांनी सांगितले की, या प्रकरणात मिळालेल्या माहितीत मुऱ्हाडे याचे नाव समोर आले होते. अटक केल्यानंतर तो दुसऱ्या व्यक्तींचे नावे सांगत आहे. या गुन्ह्यातील आरोपींची साखळी शोधण्याचा तपास सध्या सुरू आहे. आरोपीला हे पेपर कोणी पुरवले, त्याने ते कोणाला पाठवले, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे. हा सर्व कट कसा करण्यात आला याची माहिती घेतली जात आहे. 

Web Title: Arrested in Aurangabad for tearing up health department exam papers and disseminating information on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.