दोन मुलींवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 03:24 AM2018-12-13T03:24:26+5:302018-12-13T03:24:41+5:30

अंधश्रद्धेच्या नावाखाली दाखवीत होता भीती, आरोपींमध्ये महिलेचा समावेश

Arrested rape of two girls arrested | दोन मुलींवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस अटक

दोन मुलींवर बलात्कार करणाऱ्या आरोपीस अटक

Next

मुंढवा : कॉलेजचा अभ्यास अवघड जात असल्याने मुलगी कॉलेजला सतत गैरहजर राहत होती. या कारणास्तव त्या मुलीला कॉलेजच्या परीक्षेला बसता आले नाही. या गोष्टीमुळे मुलीची आई बेचैन झाली. आपल्यावर काही तरी संकट कोसळले अथवा मुलीला काहीतरी बाधा झाली आहे, या समजुतीने कोंढव्यातील एका दैवी शक्तीवाल्या महिलेकडे घेऊन गेली. या दैवी शक्तीवाल्या महिलेने दैवी शक्तीची भीती दाखवून या पीडित मुलीला व तिच्या अल्पवयीन मैत्रिणीला ‘संकट टाळते’ या बहाण्याने घरी बोलावून मानसिक छळास सुरुवात केली.

त्यानंतर कोंढव्यातील एका मंडप व्यावसायिकाच्या घरी या मुलींना नेऊन त्या मंडप व्यावसायिकाने स्वत: व त्याच्याकडे कामास असलेल्या मुलाने दुसºया अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फरीन फारूक शेख (रा. कोंढवा), पुणे व शफीक रफिक शेख (वय २८, रा. कोंढवा) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारी मुलगी ही कॉलेजमध्ये एफ.वाय. बी.कॉम.चे शिक्षण घेत असताना तिला इंग्रजी माध्यम अवघड जात असल्याने ती कॉलेजमध्ये गैरहजर राहत होती. त्यामुळे तिला परीक्षेस बसता आले नाही. त्यामुळे मुलीच्या आईने आपल्यावर काहीतरी संकट आले आहे, असे समजून इतरांच्या सांगण्यावर फरीन फारूक शेख (रा. कोंढवा, पुणे) हिच्या अंगात येते व दैवशक्ती आहे. ती संकटांवर उपाय सांगते, या भावनेने या पीडित मुलीची आई तिला घेऊन शेख हिच्याकडे कोंढवा येथे गेली. आरोपी फरीन हिने पीडित मुलीला ‘तुझ्या अंगात हजरत येईल व तुझे पेपर हजरत लिहील,’ असे सांगून आईला पटविले. ‘तुमच्या मुलीला माझ्याकडे पाठवा,’ असे सांगितले. त्यानंतर पीडित मुलगी व तिची अल्पवयीन मैत्रीण आरोपी फरीन हिच्या घरी गेल्या असता, हातपाय दाबायला सांगितले. न दाबल्यास ती मारहाण करीत असे. असे अमानुष प्रकार सुरू होते. सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा यांच्याकडे तक्रार अर्ज केल्याने परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर पीडित मुलीने ११ डिसेंबर रोजी मुंढवा पोलीस ठाण्यात महिला पोलीस हवालदार भारती होले व सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गोलांडे यांच्याकडे तक्रार दिली. त्यानंतर या आरोपींवर बलात्कार व पोस्को, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबतचा अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पात्रुडकर पुढील तपास करीत आहेत.

हा प्रकार आईला सांगितल्यास त्या पीडित मुलीला ‘तुझे मानलेल्या भावावर प्रेमसंबंध चालू आहेत असे तुझ्या आईलाच सांगेन,’ असे धमकावले. या गोष्टीमुळे पीडित मुलगी घाबरली. त्याचाच फायदा घेऊन आरोपी फरिन हिने कोंढवा येथील मंडप व्यावसायिक शफीक रफिक शेख याच्या घरी या मुलांनी नेऊन शरिफ शेख याने त्या पीडित मुलीवर व कामास असलेल्या मुलाने दुसºया अल्पवयीन मुलीवर धमाकावून वारंवार बलात्कार केला. हा प्रकार सन २०१६पासून होत होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्याच्या मदतीने तक्रार दाखल केली.

Web Title: Arrested rape of two girls arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.