ब्राऊन शुगर विक्रीसाठी आलेल्यांना अटक

By admin | Published: September 18, 2014 12:10 AM2014-09-18T00:10:51+5:302014-09-18T00:10:51+5:30

बेकायदा ब्राऊन शुगरच्या विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून 8 लाखांची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे.

Arrested for sale of brown sugar | ब्राऊन शुगर विक्रीसाठी आलेल्यांना अटक

ब्राऊन शुगर विक्रीसाठी आलेल्यांना अटक

Next
पुणो : बेकायदा ब्राऊन शुगरच्या विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली असून, त्यांच्याकडून 8 लाखांची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे.
अब्दुल रामसूद वाहबअक (वय 28, रा. पश्चिम बंगाल), सर्फराज बाबालाल बारगीर (32, कोल्हापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे मोठय़ा प्रमाणावर ब्राऊन शुगर विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती पथकाचे पोलीस कर्मचारी राकेश गुजर यांना खब:यामार्फत मिळाली होती. ती त्यांनी वरिष्ठांना दिली. त्यानुसार सहायक निरीक्षक अजय वाघमारे, पोलीस कर्मचारी राकेश गुजर, कृष्णा निढाळकर, विनायक जाधव, वासुदेव पाटील, अस्लम शेख, रोहन चवरकर, कुणाल माने, राजेंद्र बारशिंगे यांनी पुणो नगर रस्त्यावरच्या वनाई हॉटेलसमोर सापळा लावला. 
मोटारसायकलवरून आलेल्या या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 3 मोबाईल, 38क् ग्रॅम ब्राऊन शुगर मिळून आली. पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला आहे. आरोपी काही दिवस बारामतीमध्ये राहत होते. ही ब्राऊन शुगर ते कोणाला विकणार होते त्याचा तपास सुरू आहे.(प्रतिनिधी)

 

Web Title: Arrested for sale of brown sugar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.