बेकायदा सांबराच्या शिंगांची विक्री करणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:10 AM2021-05-23T04:10:34+5:302021-05-23T04:10:34+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण दिलीप शिंदे (वय २७, रा. मु. पो. पिंपरखेड, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण दिलीप शिंदे (वय २७, रा. मु. पो. पिंपरखेड, ता. शिरूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गस्ती पथकाला एक इसम तस्करी केलेल्या सांबराची शिंगांची विक्री करण्यासाठी ॲक्टिव्हावरून फुलगाव फाटा येथे येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या सूचनेनुसार फुलगाव फाटा येथे सापळा रचून प्रवीण दिलीप माने यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता, सांबराची तीन शिंगे, ॲक्टिव्हा असा ३५ हजार रुपयांचा ऐवज मिळून आला. पुढील तपास युनिट-६ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.
अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ६- चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुडे, शेखर काटे, नितीन धाडगे, करण ढंगारे यांच्या पथकाने ही कारवाई केली.