तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:15+5:302021-09-02T04:20:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी आहे. तरीही दुकानात हिरा पानमसाला, केसरयुक्त विमल पान मसाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी आहे. तरीही दुकानात हिरा पानमसाला, केसरयुक्त विमल पान मसाला (जांभाळा) रॉयल ७१७ तंबाखू यांसारख्या पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी विक्रेत्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ६७ लाख ५ हजार २२१ रुपये किमतीचे तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
शक्तीसिंग परबतसिंग राठोड (वय २७, रा. गायत्री सुपर मार्केट, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे. त्याच्यावर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीने विक्रीसाठी आणलेला गुटखा कुठून आणला आहे. याची विचारपूस करून याठिकाणी किती मोठ्या प्रमाणात गुटखा साठा आहे, याबाबत चौकशी करणे आहे. गुन्ह्यातील आरोपीसोबत आणखी कोणी साथीदार आहे का? तसेच आरोपी विरूद्ध दोषारोपपत्र तयार करून न्यायालयात पाठविणे आहे. त्यामुळे पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील बोधिनी यांनी केली. परंतु आरोपीकडून सर्व तंबाखूजन्य माल जप्त करण्यात आला असल्याने न्यायालयाने पोलीस कोठडीची मागणी रद्द करीत आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.