अश्लील व्हिडीओ पसरविणाºयाला अटक, व्हॉट्सअॅप ग्रुपवर चेहरा बदलून केला व्हिडीओ प्रसारित, तरुणीची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 03:05 AM2017-09-16T03:05:19+5:302017-09-16T03:05:31+5:30
व्हॉट्सअॅप ग्रुपवर तरुणीचा चेहरा वापरून अश्लील व्हिडीओ पसरविणा-या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्याला फरासखाना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आरोपीने ही क्लिप एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली होती.
पुणे : व्हॉट्सअॅप ग्रुपवर तरुणीचा चेहरा वापरून अश्लील व्हिडीओ पसरविणाºया व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सदस्याला फरासखाना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आरोपीने ही क्लिप एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकली होती.
मयूरेश विजय ताकवले (वय २६, रा. कसबा पेठ, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका २० वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. कसबा पेठेत गावकोस मारुती मंदिराजवळ ही तरुणी रहाते. आरोपीही त्याच परिसरात रहातो. आरोपी ताकवले याने ऋषिकेश दादा पेटकर या व्हॉट्सअॅप ग्रुपवर या तरुणीच्या चेह-याचा वापर करून लैंगिक संबंध असलेला व्हिडीओ प्रसारित केला. आरोपीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. संबंधित तरुणी वाणिज्य शाखेच्या तिस-या वर्षांत शिकत आहे. या तरुणीच्या एका ओळखीच्या मुलाने या व्हिडीओबद्दल माहिती दिली. अश्लील व्हिडीओत छेडछाड करून, संबंधित व्हिडीओतील तरुणीच्या चेहºयाला पीडित तरुणीचा चेहरा लावण्यात आला असल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. संबंधित तरुणाने हा व्हिडीओ कोणत्या ग्रुपवरून आला ते सांगितले. त्यानुसार पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. यावरून पोलिसांनी संशियित तरुणाला अटक केली. त्यानंतर संबंधित संशयित तरुणाला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे तपास करीत आहे.
आरोपी मयूरेश ताकवलेचे शिक्षण बीकॉमपर्यंत झालेले असून, तो एका खासगी कंपनीत काम करतो. फिर्यादी व आरोपी एकमेकांना ओळखत नाहीत.
आरोपीने हा इतर ग्रुपवर आलेला व्हिडीओ या ग्रुपवर प्रसारित केल्याचे सांगितले. मात्र, तसे तो सिद्ध करू न शकल्याने त्याला अटक करण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे यांनी सांगितले.