महिलेवर अत्याचार करणाऱ्यास अटक
By admin | Published: October 13, 2016 02:46 AM2016-10-13T02:46:53+5:302016-10-13T02:46:53+5:30
एका ३० वर्षांच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली़ भैराराम घाची (वय ४०, रा़ केशवनगर, मांजरी) असे त्याचे नाव आहे़ ही घटना १६ सप्टेंबर
पुणे : एका ३० वर्षांच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली़ भैराराम घाची (वय ४०, रा़ केशवनगर, मांजरी) असे त्याचे नाव आहे़ ही घटना १६ सप्टेंबर रोजी घडली होती़
फिर्यादी या त्यांच्या घरी असताना आरोपी त्यांच्या घरी आला़ बिल्डिंगच्या टेरेसवरून पाणी गळत असल्याचे त्याने सांगितले़ ते पाहण्यासाठी त्यांना टेरेसवर घेऊन गेला़ तेथे त्याने त्यांच्यावर बलात्कार केला़ या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी घाची याला अटक करून न्यायालयात हजर केले़ सरकारी वकील ए़ के़ पाचारणे यांनी अधिक तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली़ ती ग्राह्य धरून न्यायालयाने २० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली़