कोदवडी तलाठ्यास ८ हजाराची लाच घेताना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:08 AM2021-06-17T04:08:10+5:302021-06-17T04:08:10+5:30
पुणे येथील ब्रह्ममुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे योगगुरू दीपक शिळीमकर यांनी संस्थेच्या ज्ञानसा धना दामगुडा असनी येथे 20 गुंठे जागा ...
पुणे येथील ब्रह्ममुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्राचे योगगुरू दीपक शिळीमकर यांनी संस्थेच्या ज्ञानसा धना दामगुडा असनी येथे 20 गुंठे जागा खरेदी केली आहे. या खरेदीखताची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी त्यांनी या गावचे तलाठी मुकुंद चिरके यांच्याकडे पाठपुरावा करत होते. मात्र चिरके यांनी दहा हजार रुपये दिले तरच नोंद होईल असे सांगून दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शेवटी तडजोड होऊन आठ हजार रुपये द्यायचे ठरवण्यात आले होते. याबाबत शिळीमकर यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीबाबत खातरजमा झाल्यावर लाचलुचपत विभागाने आज (ता. 16 जून) रोजी सकाळी नसरापूर-चेलाडी येथील उड्डाणपुलाजवळ सापळा रचला होता. शिळीमकर यांनी तलाठी चिरके यास त्या ठिकाणी बोलावून त्यांना लाचेचे आठ हजार रुपये दिले. त्याच वेळी लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील बिले, कर्मचारी वैभव गोसावी, रतेश थरकार, भूषण ठाकूर, चालक जाधव यांनी चिरके यास रंगेहाथ पकडले. चिरके याच्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील बिले करत आहेत.