...अखेर पुण्यात सोनसाखळी चोरट्यांना अटक, चोरीचे सोने घेणार्या सराफाच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 07:03 PM2021-06-08T19:03:02+5:302021-06-08T19:03:08+5:30
गुन्ह्यातील एकूण ५७ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ मोटारसायकली असा एकूण ४ लाख १३ हजार रुपायांचा माल जप्त
पुणे: शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी करुन सोनसाखळी हिसकाविणार्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने पकडले आहे. दीपक परशुराम माळी (वय २२, रा. केशवनगर, मुंढवा) आणि मुकेश सुनिल साळुंखे (वय १९, रा. मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचे सोने विकत घेणारे सराफ सम्राट हुकुमसिंग भाटी याला अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यातील एकूण ५७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपींकडून ३ मोटारसायकली असा एकूण ४ लाख १३ हजार रुपायांचा माल जप्त करण्यात आला आहे.
सोनसाखळी चोरणारे सराईत चोरटे हडपसर परिसरात थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार अजय गायकवाड आणि चेतन चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून दीपक व मुकेश यांना ताब्यात घेतले. त्यांनी एप्रिल महिन्यात दौंड परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ४ सोनसाखळी चोरी आणि एक वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात आला.
दोघांविरुद्ध तब्बल १६ सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. मुकेश साळुंखे हा हडपसर येथील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात बऱ्याच दिवसांपासून फरार होता.