‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लाडक्या सासवडमध्ये बाप्पांचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:12 AM2021-09-11T04:12:41+5:302021-09-11T04:12:41+5:30
विविध आकारांतील आणि विविध प्रकारांतील, तसेच शाडू माती, पेणच्या मूर्ती, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आदी २५१ पासून ...
विविध आकारांतील आणि विविध प्रकारांतील, तसेच शाडू माती, पेणच्या मूर्ती, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आदी २५१ पासून २० ते २५ हजार रुपये किमतीपर्यंत उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये मूर्ती स्थापनेचा मुहूर्त साधण्यासाठी घरगुती मूर्ती बसविण्यासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी होती, तसेच विविध मंडळांच्या मूर्ती स्थापन करण्यासाठी दुपारनंतर मोठी गर्दी केली होती.
-------------------------------सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या अनेक गणेश मंडळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लगेचच उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून, अनेक सामाजिक संदेश देत तसेच कोविड - १९ (कोरोना) या आजाराविषयी जनजागृती करण्यास, तसेच मदत करण्यास अनेक मंडळे सरसावली आहेत.
-------------------------------फोटो क्रमांक: १०सासवड गणपती बाप्पा
फोटो ओळ ; सासवड (ता. पुरंदर) येथील बाजारपेठेतून घरी प्रतिष्ठापना करण्यासाठी श्रीगणेशाची मूर्ती नेत असताना.
100921\1810-img-20210910-wa0008.jpg
गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन.. ..