बेल्हा आठवडे बाजारात बैलांची आवक कमी, आर्थिक उलाढालही मंदावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:13 AM2021-09-07T04:13:32+5:302021-09-07T04:13:32+5:30
येथील सोमवारच्या बाजारातील बाजारपेठ जनावरांच्या साज-सामानाने सजली नव्हती. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा ...
येथील सोमवारच्या बाजारातील बाजारपेठ जनावरांच्या साज-सामानाने सजली नव्हती. शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या बैलांशी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे. बाजारपेठेत घुंगरू, झालर, दोरी, नाथे, कवळी या वस्तू दाखल झाल्या आहेत, तर शेतकऱ्यांची हे सामान खरेदी करण्यासाठी गर्दी नव्हती. बैलपोळा हा सण ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलपोळ्यानिमित्त येथील बाजारपेठेत सजावटीच्या विविध वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्या आहेत. त्यामध्ये बैलांसाठी निरनिराळे गोंडे, मातीचे बैल,रंग आणि घुंगरुंच्या माळांनी दुकाने सजली होती तसेच भावही जास्तच होते. गावातील दुकानांमध्येही पोळ्यासाठीचे साहित्य विक्रीस होते. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला एक दिवस आराम मिळावा या उद्देशासह त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण थाटामाटात ग्रामीण भागात साजरा केला जातो.यंदा समाधानकारक पाऊस नसल्याने बाजारात काहीशी मंदी आहे. सजावटीचे सामान पुणे,मुंबईहून मागविण्यात येते,त्यात बैलांच्या पाठीवर टाकण्यासाठी रंगबिरंगी झूल,घुंगरांचा पट्टा,हिरव्या रंगाची गोंडे,पितळी घंटा,प्लास्टिकची कवड्यांच्या माळा,घुंगरांच्या माळा दाखल झाल्या आहेत.त्याचप्रमाणे पोळ्याच्या दिवशी नटूनथटून सजलेल्या आपल्या सर्जाराजाला नजर लागू नये म्हणून काळ्या धाग्यात बनविलेले दृष्टमणीही बाजारात दाखल झाले आहे. येथील प्रसिद्ध असणाऱ्या बैलबाजारात बैलांची आवकही कमी प्रमाणात झाली. बैलजोडीचे भावही कमीच होते. लांबून कोणीही व्यापारी व शेतकरी आले नव्हते.
060921\20210906_110426.jpg
बेल्हा(ता.जुन्नर)येथील आठवडे प्रसिद्ध बैल बाजारात बैलांची आवक कमी झालेली दिसत आहे.