कोथींबिरीची सव्वालाख, तर मेथीची ६० जुड्यांची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:12 AM2021-08-23T04:12:59+5:302021-08-23T04:12:59+5:30
मेथीची अवघी ६० हजार जुड्यांची आवक झाली. इतर पालेभाज्यांचे भाव मागणी आणि पुरवठा समप्रमाणात आहे. त्यामुळे बाजारभावात कोणत्याही प्रकारची ...
मेथीची अवघी ६० हजार जुड्यांची आवक झाली. इतर पालेभाज्यांचे भाव मागणी आणि पुरवठा समप्रमाणात आहे. त्यामुळे बाजारभावात कोणत्याही प्रकारची वाढ झाली नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
घाऊक बाजारात कोथिंबिरीची जुडी ३ ते ६ रुपयांना, तर किरकोळ बाजारात १० ते १५ रुपयांना विक्री केली जात आहे. मेथीची घाऊक बाजारात ४ ते ७ रुपये तर किरकोळ बाजरात १० ते १२ रु
पयांना विक्री केली जात होती.
पालेभाज्यांचे घाऊक बाजारातील भाव (शेकडा जुडी ) :- कोथिंबीर : ३०० -६००, मेथी : ४००-७००, शेपू : ३००- ४००, कांदापात : ४००-६००, चाकवत : ४००-५००, करडई : ५००-७००, पुदिना १००-३००, अंबाडी : ४००-५००, मुळे : ६००-८००, चवळई : ५००-७००, पालक : ४००-७००, राजगिरा : ४००-५००, चुका ३००-५००.
------------------------
फोटो ओळ : १) मार्केट यार्डात रविवारी आवक झालेली कांदापात.
२) तसेच भाजीपाल्यात शेपूची मोठी आवक झाली आहे.