विदेशी पाहुण्यांचे उजनी धरणक्षेत्रात आगमन
By admin | Published: January 3, 2016 04:39 AM2016-01-03T04:39:47+5:302016-01-03T04:39:47+5:30
थंडीची हुडहुडी वाढल्याने विदेशी पाहुण्यांची उजनी पाणलोट क्षेत्रात आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या भागात पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पक्षिपे्रमींसाठी ही एक प्रकारे पर्वणीच आहे.
भिगवण : थंडीची हुडहुडी वाढल्याने विदेशी पाहुण्यांची उजनी पाणलोट क्षेत्रात आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या भागात पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पक्षिपे्रमींसाठी ही एक प्रकारे पर्वणीच आहे.
दरवर्षी थंडीमध्ये फ्लेमिंगो पक्षी इटली, आॅस्ट्रेलियातून भारतामध्ये गुजरात तसेच महाराष्ट्रातील मुंबई व पुणे जिल्ह्यामध्ये उजनी धरणाच्या भिगवण परिसरातील तक्रारवाडी, डिकसळ, कुंभारगाव या पाणलोट क्षेत्रात येतात. भिगवण शहर पुणे-सोलापूर महामार्गावर वसले असल्याने वाहतूक सोयीस्कर होते. त्यामुळे त्या शेजारील सर्व परिसर हा पर्यटकांसाठी पर्यटनाचा आकर्षण बिंदू होत असल्याचे दिसून येते. यामुळे या परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळत असल्याचे दिसून
येत आहे.
या ठिकाणी देश-विदेशातील अनेक पर्यटक पक्षिनिरीक्षणासाठी तसेच वाईल्ड फोटोग्राफीसाठी येत असतात. तक्रारवाडी हे गाव एटीएमद्वारे स्वच्छ पाणी, तसेच वृक्षलागवड आणि निर्मल ग्राम पुरस्कारामुळे राज्यात नावाजले आहे. त्यामुळे राज्यातून अनेक नागरिक आणि पदाधिकारी या गावाला भेट देण्यासाठी आवर्जून येतात. यामुळे तक्रारवाडी हे गाव आता पर्यटन क्षेत्रातही आपले नाव रुजवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथील काही तरुणांनी भेट देणाऱ्या पर्यटकांना सुविधा पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.
...तर व्यवसायवाढ
होण्यास मदत
पर्यटकांना पक्ष्यांची माहिती देणे, जेवणाची व्यवस्था करणे आणि त्यांच्या निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था करण्याचे काम सुरू केले आहे. यातून तरुणांना रोजगार मिळत असून, त्यांची उपजीविका पार पडण्यास मदत होईल.