पुण्यात यंदाही साधेपणाने गणरायाचे आगमन; विधिवत प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:15 AM2021-09-10T04:15:12+5:302021-09-10T04:15:12+5:30
यंदा मंडळांच्या बैठकीत गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यास एकमत झाले आहे. गणेश मंडळांनी भाविकांसाठी २४ तास ऑनलाइन दर्शनाची सुविधा केली ...
यंदा मंडळांच्या बैठकीत गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यास एकमत झाले आहे. गणेश मंडळांनी भाविकांसाठी २४ तास ऑनलाइन दर्शनाची सुविधा केली आहे. गणेशोत्सवाची ओळख असणारे सांस्कृतिक कार्यक्रमही फेसबुक व युट्यूूबवरून प्रक्षेपित करण्याचे नियोजन आहे.
मानाचा पहिला : श्री कसबा गणपती
श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ११. ३८ वाजता खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते होईल. प्राणप्रतिष्ठा सोहळा फेसबुक लाईव्हद्वारे पहावा, अशी विनंती मंडळाने केली आहे. दररोज सायंकाळी ८ वाजता श्रींच्या आरतीचा लाभ भाविकांना घेता येईल, अशी माहिती अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली. आॅनलाइन दर्शन @रँ१्रह्यं२ुंँल्लस्रं३्र/ऋंूीुङ्मङ्मह्य या लिंकवर करता येईल.
मानाचा दुसरा : श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ११. ३० वाजता सनई चौघडांच्या कर्णमधुर साथीत वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्या हस्ते होणार आहे. सर्व नागरिक. हितचिंतक, आणि सभासदांना @रँ१ीी ळेुंं्िर खङ्मॅी२ँ६ं१्र ॠंल्ली२ँङ्म३२ं५ टंल्लंिह्ण/ङ्म४ळ४ुी या लिंकद्वारे सोहळ्यात सहभागी होता येईल, अशी माहिती अध्यक्ष प्रशांत टिकार यांनी दिली आहे.
मानाचा तिसरा : गणपती गुरुजी तालीम
गुरुजी तालीम मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १ वाजता श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनित बालन यांच्या हस्ते होणार आहे. मंडळाच्या उत्सव मूर्तीचे हे ५० वे वर्ष आहे. दररोज सकाळ संध्याकाळ कार्यकर्त्यांच्या हस्ते श्रींची आरती, गणेश याग, मंत्रजागर, सत्यनारायण महापूजा असे धार्मिक विधी गणेशोत्सवात होणार आहे. @गुरुजी तालीम मंडळ/ऋंूीुङ्मङ्मह्य या आॅनलाईन लिंकद्वारे गणेश भक्तांना श्रीं चे दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांनी दिली आहे.
मानाचा चौथा : तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२.३० वाजता बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांच्या हस्ते होणार आहे. गणपती मंदिरात प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिराभोवती आकर्षक घंटी महालाची सजावट सरपाले बंधूंनी साकारली आहे. ''@मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट/ऋंूीुङ्मङ्मह्य'' या लिंकच्या माध्यमातून नागरिकांना त्याचा आनंद घेता येणार आहे. गणेशोत्सवात यू ट्यूबवर ‘शिल्पकारांचा गणपती’ या मालिकेतून तुळशीबाग मंडळात जडणघडण झालेल्या कलाकारांच्या मुलाखतीतून त्यांचे अनुभव व त्या काळी साकारलेले देखावे यांची माहिती मिळणार आहे. गणेश याग, बृहनस्पती याग, मंत्रजागर, असे धार्मिक विधी गणेशोत्सवात होणार आहे, अशी माहिती कोषाध्यक्ष नितीन पंडित यांनी दिली.
मानाचा पाचवा : केसरीवाडा गणपती मंडळ
केसरीवाडा गणपती मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी १० वाजता रोहित टिळक यांच्या हस्ते होणार आहे. गणपतीच्या ऑनलाईन दर्शनाचा लाभ @ङएरअफकठएहरढअढएफ/ङ्म४ळ४ुी या लिंकद्वारे भाविकांना घेता येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. गीताली टिळक यांनी दिलीे.