चाकण परिसरात उत्साहात गणरायाचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:10 AM2021-09-11T04:10:14+5:302021-09-11T04:10:14+5:30

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आज शुक्रवारी ( दि.१० ) रोजी चाकण पंचक्रोशीतील गावांसह औद्योगिक वसाहतीत मोठ्या ...

Arrival of Ganaraya in Chakan area with enthusiasm | चाकण परिसरात उत्साहात गणरायाचे आगमन

चाकण परिसरात उत्साहात गणरायाचे आगमन

Next

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आज शुक्रवारी ( दि.१० ) रोजी चाकण पंचक्रोशीतील गावांसह औद्योगिक वसाहतीत मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले. सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट असल्याने चाकण शहरातील मोठ्या गणेश मंडळांनी शासकीय नियमांचे पालन करत कुठल्याही प्रकारची रोषणाई व ढोल ताशांचा गजर न करता ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणपतीची मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्त्यांची खरेदीसाठी बाजारपेठेत असलेली लगबग यावर्षी दिसून आली नाही.त्यामुळे बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल मंदावली असल्याचे व्यवसायिकांनी सांगितले.

चाकण उद्योग पंढरीच्या टप्पा क्रमांक दोनमधील काही कंपन्यांमध्ये प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही गणेश भक्तांनी साधेपणाने परंतु मोठ्या भक्तीभावाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा केली आहे. कोरोनाच्या महामारीमुळे कंपन्यांसह गावांमध्ये सोशल डिस्टन्स पाळत तोंडाला मास्क लावूनच साधेपणाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. यावर्षी गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यास शासकीय निर्बंध असल्याने कुठेही दरवर्षी प्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी होणार नाही.

Web Title: Arrival of Ganaraya in Chakan area with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.