कुंभारवाड्यात गणेशाच्या आगमनाची लगबग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 03:44 AM2018-08-22T03:44:08+5:302018-08-22T03:44:36+5:30

अवघ्या महिनाभरात श्रींचे आगमन; मूर्तिकारांच्या अखेरच्या कामाला वेग, घाई...

The arrival of Ganesha in Kumbharwad | कुंभारवाड्यात गणेशाच्या आगमनाची लगबग

कुंभारवाड्यात गणेशाच्या आगमनाची लगबग

Next

हडपसर : श्रीगणेशाचे आगमन अवघ्या महिन्यावर येऊन ठेपल्याने सध्या शहरातील श्रींच्या मूर्ती बनविणाऱ्या कारखान्यांबरोबर कुंभारवाड्यांमध्ये मूर्तीची आॅर्डर देण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मूर्तिकारांनी मूर्ती तयार करणे, रंग देण्याच्या कामाला गती दिली आहे. वाढत्या महागाईने मूर्तीसाठी लागणाºया साहित्याच्या दरातही वाढ झाल्याने यंदा बाप्पाही महागणार आहेत.
श्रींच्या उत्सवाची चाहूल आतापासूनच लागल्यामुळे श्रींच्या स्वागताची जय्यत तयारीही सुरू झाली आहे. श्रींच्या मूर्ती बनविणाºया छोट्या-मोठ्या कारखान्यांमध्ये कलाकारांची धांदल उडाली आहे. जसजसा सण जवळ येऊ लागला, तसतसा कलाकार दिवसरात्र काम करताना पाहायला मिळत आहेत. गणेशोत्सव जवळ आल्याने मूर्तिकार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते तबल्यावरील, नागावरील, लालबागचा, मोरावरील, फेट्यामधील, पेशवाई, बालगणेश, सम्राट, पाटील, शेतकरी फेटा अशा रूपातील श्रींच्या मूर्ती बनविण्याच्या आॅर्डर्स देत आहेत. सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात बाप्पांचे आगमन होत आहे. भाविकांचा इको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल वाढला आहे. मात्र यंदाही मूर्तिकारांनी महागाईचा मुद्दा घेत बाप्पांच्या मूर्ती कमळामध्ये, धनलक्ष्मीच्या रूपात बनविल्या आहेत. दरवर्षीपेक्षा यावेळी मूर्तीच्या दरात काहीशी वाढ झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
कारखान्यांमध्ये वर्षभर काम सुरू असले, तरी शेवटच्या क्षणी मात्र कलाकारांची धांदल उडतेच. गणेशभक्तांची आवडनिवड जोपासावी लागते. पावसाचे दिवस असल्याने रंग वाळत नाहीत. मागणी वाढत असते, वॉशिंंग करून ठेवले जाते, त्यामुळे पाऊस जास्त असला तरी हॅलोजन बल्ब लावून रंग सुकवता येतो. आमच्याकडे ८५ प्रकारच्या मूर्ती आहेत. तुळशीबाग, मंडई, दगडूशेठ, कसबा पेठ, जवाहर आळी आणि मुंबईच्या लालबागचा राजा असे मानाचे गणपती आहेत, त्यांना मागणी वाढली आहे, असे हांडेवाडी रोड येथील कलाकार दिलीप निघोल, अक्षय निघोल आणि रश्मी निघोल यांनी सांगितले.

शाडूमूर्तीची कार्यशाळा
मेडिकल असोसिएशन ही हडपसर पंचक्रोशीतील वैद्यकीय व्यावसायिकांची संघटना विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. रुग्णांचे आरोग्य सांभाळताना पर्यावरणाचा समतोल सांभाळला पाहिजे, आपल्या परंपरा जपताना पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये, या भावनेतून सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘शाडूमातीच्या पर्यावरण पूरक गणेशमूर्ती’ बनविण्याची कार्यशाळा रविवारी रामचंद्र बनकर शैक्षणिक क्रीडा संकुल येथे आयोजिली होती. या कार्यशाळेला सभासद आणि कुटुंबीय असे २०० जणांनी सहभाग घेतला. डॉ. चेतन म्हस्के सर्जन आणि डॉ. गणपत शितोळे ज्येष्ठ फिजिओथेरपिस्ट यांनी गणेशमूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले आणि मार्गदर्शन केले, तसेच शाडूमातीच्या गणेशमूर्ती कशा पर्यावरणपूरक आहेत, याची माहिती दिली. डॉ. शितोळे यांनी हडपसर परिसरातील विविध शाळा तसेच गृहप्रक्लप येथे जवळपास २५-३० कार्यशाळा घेतल्या आहेत. सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशस्तिपत्रके डॉ. म्हस्के आणि डॉ. शितोळे यांच्या हस्ते देण्यात आली. या कार्यशाळेसाठी हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, सचिव डॉ. सचिन आबणे, कोषाध्यक्ष डॉ. प्रशांत चौधरी, उपाध्यक्ष डॉ. राहुल झांजुर्णे, सहसचिव डॉ. मंगेश बोराटे, डॉ. अजय माने, महिला प्रतिनिधी डॉ. सुवर्णा गायकवाड यांचे सहकार्य लाभले.

Web Title: The arrival of Ganesha in Kumbharwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.