जेजुरीत घरोघरी गौराईचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:15 AM2021-09-14T04:15:09+5:302021-09-14T04:15:09+5:30
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे सण, उत्सव, यात्रा साजरे करताना मर्यादा आल्या आहेत. सार्वजनिक उत्सव तर बंद ठेवण्यात आले ...
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे सण, उत्सव, यात्रा साजरे करताना मर्यादा आल्या आहेत. सार्वजनिक उत्सव तर बंद ठेवण्यात आले आहेत. अगर अतिशय साध्या पद्धतीने ते साजरे केले जात आहेत. जेजुरी शहरात तीसहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे असून कोठेही गाजावाजा न करता अतिशय साध्या पद्धतीने मंडळे आरती पूजा करीत आहेत. शहरात घराघरात गौराई गणपती उत्सव उत्साहात साजरा होत आहे. गौराई व गणपतीसमोर विविध धार्मिक, सामाजिक देखावे, आकर्षक फुलांची सजावट, विद्युत रोषणाईही केलेली पाहण्यास मिळत आहे. घरीच अतिशय उत्साहाने सजावट करून सणाचा आनंद घेतला जात आहे.
गौराईच्या आगमनाने गोडधोड पदार्ध, फराळ, पुरणपोळी यांची रेलचेल तसेच हळदीकुंकू कार्यक्रमाच्या निमित्तानेही महिलांनी पुढाकार घेऊन आकर्षक सजावट केलेली आहे. जुनी जेजुरीतील मनीषा काळे यांनी गणेश पाटलांचा वाडा हा पर्यावरण पूरक देखावा केला आहे. भाविक आवर्जून हा देखावा पाहण्यासाठी भेट देत आहेत, तर मार्तंड देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे यांच्या कुटुंबीय सोनाली निकुडे यांनी कडेपठार मंदिर गाभाऱ्याचा आकर्षक देखावा केला आहे
१३ जेजुरी
मनीषा काळे यांनी केलेला गणेश पाटलांचा वाडा पर्यावरण पूरक देखावा
१३ जेजुरी १
सोनाली निकुडे यांचा कडेपठार मंदिर गाभारा देखावा.
130921\save_20210913_190302.jpg
मनीषा काळे यांनी सादर केलेला पर्यावरण पूरक गणेश पाटलांचा वाड्याचा देखावा