मार्केट यार्डात शेवंतीच्या फुलांची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:06+5:302021-07-05T04:08:06+5:30
पुणे : मार्केट यार्डातील फूलबाजारात शेवंतीच्या फुलाची आवक वाढली आहे. मात्र, कोरोना निर्बंधांमुळे अद्याप अपेक्षित मागणी नाही. तर इतर ...
पुणे : मार्केट यार्डातील फूलबाजारात शेवंतीच्या फुलाची आवक वाढली आहे. मात्र, कोरोना निर्बंधांमुळे अद्याप अपेक्षित मागणी नाही. तर इतर फुलांचीही आवक कायम असून दरही टिकून आहेत. प्रशासनाने कोरोना निर्बंध शिथिल केल्यास फुलांना देखील मागणी वाढेल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे :- झेंडू : २०-४०, गुलछडी : ३०-५०, अष्टर : जुडी १०-२०, सुट्टा ५०-८०, कापरी : २०-४०, शेवंती : ४०-६० (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : ५०-१२०, जर्बेरा : ४०-५०, कार्नेशियन : ८०-१२०, शेवंती काडी ८०-१५०, लिलियम (१० काड्या) ६००-८००, ऑर्चिड ३००-४००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ३०-८०, मोगरा १००-१५०.