पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात देवगड हापूसची आवक
By अजित घस्ते | Published: November 30, 2023 03:36 PM2023-11-30T15:36:39+5:302023-11-30T15:38:38+5:30
५ डझनाच्या एका पेटीला तब्बल २१ हजार रूपये भाव मिळाला...
पुणे : देवगड हापूसच्या आगाप उत्पादनातील आंब्याची पहिली आवक पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात आडते असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष युवराज काची यांच्या १८० तुळजाराम पंथाराम बनवारी काची या गाळ्यावर झाली.
पाच पेट्यांपैकी ५ डझनाच्या एका पेटीला तब्बल २१ हजार रूपये भाव मिळाला. तर, त्याखोलो खाल इतर पेट्यांना १५ आणि ११ हजार रूपये याप्रमाणे पेटीला भाव मिळाला. कोथरूड येथील खरेदीदार ज्योतिराम बीराजदार आणि जगन्नाथ वंजारी यांनी या आंब्याची खरेदी केली.
देवगड येथील रज्जाद काची यांच्या बागेतील हा आंबा असून मुंबईहुन पुण्यातील बाजारात दाखल झाला आहे. यावेळी आडतदार युवराज काची म्हणाले, हंगामपुर्व उत्पादनातील आंब्याची पहिली आवक पुणे बाजार समिती गुलटेकडी बाजारात दाखल झाला आहे. प्रत्येक वर्षी अशा सुरूवातीच्या टप्पात येत असतात. त्यांची बोली लावून पाच पेट्यांपैकी ५ डझनाच्या एका पेट्टीला तब्बल २१ हजार रूपये भाव मिळाला. टप्प्पाटप्प्याने देवगड हापूसचा हंगाम सुरू होऊन, फेब्रुवारी मध्ये नियमित हंगाम सुरू होईल.यावेळी मोठया प्रमाणात आंब्याची आवक होवून देवगड हापूस आंब्याची चव ग्रहाकांना चाखता येणार आहे.