पुण्यात ’गणपती बाप्पा मोरया’ च्या जल्लोषात ‘श्रीं’चे घरोघरी आगमन; फुलांची आरास, छोटखानी देखाव्यांच्या माध्यमातून बाप्पा विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 08:16 PM2021-09-10T20:16:04+5:302021-09-10T20:18:55+5:30

मोदक मिठाईच्या गोडव्याने बाप्पाच्या आगमानाचा आनंद द्विगुणित झाला

Arrival of 'Shree' in Pune in celebration of 'Ganapati Bappa Morya'; Bappa enthroned through flower arrangements, short scenes | पुण्यात ’गणपती बाप्पा मोरया’ च्या जल्लोषात ‘श्रीं’चे घरोघरी आगमन; फुलांची आरास, छोटखानी देखाव्यांच्या माध्यमातून बाप्पा विराजमान

पुण्यात ’गणपती बाप्पा मोरया’ च्या जल्लोषात ‘श्रीं’चे घरोघरी आगमन; फुलांची आरास, छोटखानी देखाव्यांच्या माध्यमातून बाप्पा विराजमान

googlenewsNext
ठळक मुद्देअनेकांनी बाप्पाच्या आगमनाची क्षणचित्रे सोशल मीडियावर केली पोस्ट बाप्पाला घरी नेताना सहकुटुंब पारंपारिक वेशभूषेत आले दिसून

पुणे : ’गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात शुक्रवारी घरोघरी ’श्रीं’चे आगमन झाले. कोरोनामुळे पसरलेल्या नैराश्यमयी वातावरणात लाडक्या बाप्पाच्या आगमनाने उत्साह आणि आनंदाचे रंग भरले. आकर्षक रंगावली. फुलांची आरास, लाईटिंगच्या माळा, छोटखानी देखाव्यांच्या माध्यमातून बाप्पा घरोघरी विराजमान झाला. ‘मोदक मिठाईच्या गोडव्याने बाप्पाच्या आगमानाचा आनंद द्विगुणित झाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी कुटुंबांमधला उत्साह कमी झालेला नव्हता. गणरायाची मूर्ती घरी नेण्यासाठी सकाळपासूनच गणेश मूर्तींच्या स्टॉलवर भाविकांची गर्दी झाली होती. मध्यवर्ती पेठांसह, जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता व उपनगरच्या भागात ’गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत बाप्पाला घरी नेताना सहकुटुंब पारंपारिक
वेशभूषेत दिसून आली. कोणी दुचाकीवर, कोणी चारचाकीत, कोणी रिक्षात तर कोणी टॅम्पोत बाप्पाला उत्साहाने घरी घेऊन जाताना दिसत होते. काहींनी पारंपरिक वेशभूषेत जयघोष करत बाप्पाला घरी नेले.

घराघरांमध्ये सकाळपासून बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू होती. महिला वर्ग नैवेद्यासाठी मोदक करण्याच्या तयारीत मग्न होता. सकाळी आठपासून ते चार वाजेपर्यंत शहरात ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जल्लोष सुरू होता. घरोघरी ‘श्रीं’ची विधिवत प्रतिष्ठापना करून आरती आणि नैवेद्य दाखविण्यात आला. अनेकांनी बाप्पाच्या आगमनाची क्षणचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली. बाप्पाच्या आगमानाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर करण्यात आले तर व्हॉट्सअॅपवर घरगुती बाप्पाची आणि सजावटीची छायाचित्रे अनेकांनी पोस्ट करत आनंद द्विगुणित केला. तर घरगुती गणपतीसोबतचा खास सेल्फीही तरुणाईने शेअर केला अन त्यावर लाईकचा वर्षावही झाला.

Web Title: Arrival of 'Shree' in Pune in celebration of 'Ganapati Bappa Morya'; Bappa enthroned through flower arrangements, short scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.