महाशिवरात्रीनिमित्त मार्केट यार्डात रताळांची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:13 AM2021-03-10T04:13:12+5:302021-03-10T04:13:12+5:30
पुणे : महाशिवरात्रीनिमित्त मार्केट यार्डात मोठ्याप्रमाणात रताळांची आवक होते. गुरूवारी (दि. 11) महाशिवरात्र आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील तरकारी ...
पुणे : महाशिवरात्रीनिमित्त मार्केट यार्डात मोठ्याप्रमाणात रताळांची आवक होते. गुरूवारी (दि. 11) महाशिवरात्र आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील तरकारी विभागात रताळांची आवक सुरू झाली आहे. राज्यातून सांगली जिल्ह्यातील कराड, मलकापूर, बीड, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, बार्शी, धुळे आणि जालना भागातून, तर कर्नाटक येथूनही रताळांची आवक होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव कमी मिळत आहे. गावरान रताळीला घाऊक बाजारात किलोस 15 ते 16 रुपये दर मिळत आहे. जो गेल्या वर्षी 18 ते 20 रुपये होता. कर्नाटक आणि राज्यातील काही भागातून आलेल्या सटाणा रताळीला किलोस 10 ते 12 रुपये भाव मिळत असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.
येथील बाजारात राज्यातून गावरान रताळ्याची 15 ते 20, तर कर्नाटक येथून 6 ते 7 गाड्यांची आवक झाली आहे. दोन वर्षांपूर्वी गावरान रताळींना किलोस 25 ते 30 रुपये दल मिळत होता. मात्र, आवक मागणीच्या तुलनेत जास्त होत असल्याने दोन वर्षात तुलनेत कमी दर मिळत आहे.