कला क्षेत्रीताल मान्यवरांची बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाच्या समितीमध्ये वर्णी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 06:47 PM2019-03-12T18:47:15+5:302019-03-12T18:52:08+5:30

पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात मानदंड प्रस्थापित केलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या वास्तूचा पुनर्विकास करण्याची घोषणा महापालिकेने करताच ही वास्तू पाडली जाण्याच्या चर्चेने सांस्कृतिक विश्वात खळबळ उडाली होती.

The art fielders In the Committee of the Balgandharva Rangamandar Redevelopment | कला क्षेत्रीताल मान्यवरांची बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाच्या समितीमध्ये वर्णी 

कला क्षेत्रीताल मान्यवरांची बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाच्या समितीमध्ये वर्णी 

googlenewsNext
ठळक मुद्देत्यांच्या उपस्थितीत होणार प्रस्तावांचे सादरीकरण महापालिकेच्या अंदाजपत्रकात ११ कोटी ४० लाखांची लाख रूपयांची तरतूद वास्तू विशारदांकडून 52 प्रस्ताव महापालिकेकडे प्राप्त

पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंदर्भात कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास समिती स्थापन केली जावी आणि त्यामध्ये कला क्षेत्रातील व्यक्तींचा प्रामुख्याने समावेश असावा या रंगधर्मींच्या मागणीला महापालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, पुनर्विकासासंबंधी निर्णय घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये सांस्कृतिक व कला विश्वातील तब्बल आठ मान्यवरांची वर्णी लावण्यात आली आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंदर्भात आलेल्या प्रस्तावांची त्यांच्या उपस्थितीत पडताळणी होणार आहे. येत्या काही दिवसातच समितीच्या बैठकीमध्ये प्रस्तावांचे सादरीकरण करून अंतिम आराखडा निश्चित केला जाणार  आहे.
पुण्याच्या सांस्कृतिक विश्वात मानदंड प्रस्थापित केलेल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या वास्तूचा पुनर्विकास करण्याची घोषणा महापालिकेने करताच ही वास्तू पाडली जाण्याच्या चर्चेने सांस्कृतिक विश्वात खळबळ उडाली होती. मात्र महापालिकेने या वास्तूचा  पुनर्विकास करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल आणि त्यानंतरच पुर्नविकासाच्या दिशेने पावले उचलली जातील असे स्पष्ट केले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने समिती स्थापन केली असून, त्यात उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, स्थायी समिती अध्यक्ष, माजी स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, वास्तुशिल्पकार (भवन), आर्किटेक्ट यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, प्रशांत दामले, कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, नाट्यकर्मी श्रीरंग गोडबोले, बालगंधर्व परिवाराच्या अनुराधा राजहंस, दिग्दर्शक प्रविण तरडे, निवेदक सुधीर गाडगीळ, आशय फिल्म क्लबचे विरेंद्र चित्राव या आठ जणांचा समावेश करण्यात आला आहे. 
आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज रंगमंदिर, मनोरंजनाच्या सुविधा, वाहनांसाठी मुबलक जागा अशा माध्यमातून बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा विचार करण्यात येणार आहे. त्याकरिता महापालिकेच्या अंदाजपत्रकात ११ कोटी ४० लाखांची लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी वास्तूविशारदांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार वास्तू विशारदांकडून 52 प्रस्ताव महापालिकेकडे प्राप्त आले आहेत. या समितीसमोर प्रस्तावांचे सादरीकरण होणार आहे.

Web Title: The art fielders In the Committee of the Balgandharva Rangamandar Redevelopment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.