कलेतून विश्व सौंदर्याची अनुभूती
By admin | Published: December 7, 2014 12:45 AM2014-12-07T00:45:39+5:302014-12-07T00:45:39+5:30
विचारवंत जीवनाला सुंदरतेकडे नेणारे विचार देतात. कलावंत हे त्याच विचारवंतांच्या सौंदर्याचा आविष्कार घडवीत असतात.
Next
सहकारनगर : विचारवंत जीवनाला सुंदरतेकडे नेणारे विचार देतात. कलावंत हे त्याच विचारवंतांच्या सौंदर्याचा आविष्कार घडवीत असतात. त्यामुळे कलेतून विश्व सौंदर्याची अनुभूती मिळते, असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणो यांनी व्यक्त केले.
सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने सुखकर्ता सांस्कृतिक पुरस्कार यंदा प्रणीत कुलकर्णी, अंजली मालकर, भास्कर पावसकर, मीनल दातार, बंडा जोशी यांना देखणो यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. तसेच सुखकर्ता कलाउपासक पुरस्कार डॉ. व्ही.एच. क्षीरसागर, मुकुंद फडकुले, अजय पराड, समीप कुलकर्णी, गीतांजली जेधे, सुप्रिया फुलारे-दुधाळ, प्रमोद सुग्रे, विजय जोशी, हरिदास शिंदे, देवेश अभ्यंकर यांचा गौरव केला. प्रास्ताविक मंदाताई नाईक यांनी केले. सूत्नसंचालन विजय सातपुते व आभार मिलिंद तांबोळी यांनी मानले. आयोजन चंद्रशेखर कोरडे, धनश्री पुराणिक, सुरेखा जोशी, रमाकांत प्रसादे , साहेबराव मांढरे, मीना पेठकर यांनी केले. (वार्ताहर)
4उत्कृष्ट संस्था- रोटरी क्लब ऑफ कात्नज, वेदिता मंडळ.
4उत्कृष्ट दिवाळी अंक : प्रथम क्रमांक- शैव प्रबोधन दिवाळी अंक, द्वितीय क्रमांक- विशाखा दिवाळी अंक, तृतीय क्रमांक-निवांत ज्येष्ठ नागरिक संघ.
4उत्कृष्ट झांज पथक : जयनाथ मंडळ, धनकवडी.
4काव्यलेखन स्पर्धा : विषय आई - प्रथम क्रमांक- र}माला खिवंसरा, द्वितीय क्रमांक- संतोष गाढवे, तृतीय क्रमांक- भालचंद्र कोळपकर.
4काव्यलेखन स्पर्धा : विषय वडील. प्रथम क्रमांक -मीनाक्षी नवले, द्वितीय क्रमांक- शोभा जोशी : परांजपे, तृतीय क्रमांक- प्रतिभा पवार.
4आदर्श गणोशोत्सव स्पर्धा : प्रथम क्रमांक- अरण्येश्वर मंडळ, गवळीवाडा, द्वितीय क्रमांक आदर्श मित्नमंडळ धनकवडी, तृतीय क्रमांक- महात्मा गांधी मित्न मंडळ, उत्तेजनार्थ- सहकार तरुण मंडळ.
4आदर्श गणोशोत्सव : सोसायटी विभाग प्रथम क्रमांक- गगन विहार सोसायटी, द्वितीय- नॅन्सी लेक होम, तृतीय ऋतुराज मित्नमंडळ, उत्तेजनार्थ साईनंदन मित्नमंडळ.