खंडांमधून उलगडणार युरोपियन संस्कृतीचा आलेख, सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 02:26 AM2019-02-05T02:26:43+5:302019-02-05T02:27:02+5:30

महाराष्ट्र शासनाने महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन करून बडोदा साहित्य संमेलनात बारा खंडांचे प्रकाशन केले.

Article of the European culture to be unearthed through volumes, Sayajirao Gaikwad Character Tools publication committee | खंडांमधून उलगडणार युरोपियन संस्कृतीचा आलेख, सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती

खंडांमधून उलगडणार युरोपियन संस्कृतीचा आलेख, सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती

googlenewsNext

- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : महाराष्ट्र शासनाने महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन करून बडोदा साहित्य संमेलनात बारा खंडांचे प्रकाशन केले. दुसऱ्या टप्प्यातील खंडांमध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी गिबन या युरोपियन इतिहासकाराच्या ग्रंथावर लिहिलेल्या टीकाग्रंथाचा समावेश आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला होता. या दोन्ही खंडांच्या माध्यमातून युरोपियन संस्कृतीचा उत्कर्ष आणि घसरणीचा काळ वाचकांना जाणून घेता येणार आहे.
एडवर्ड गिबन हा अठराव्या शतकातील एक विचारवंत, इतिहासकार, लेखक, प्रशासक होता. त्याचा ‘डिक्लाइन अँड फॉल आॅफ द रोमन एम्पायर’ हा युरोपियन इतिहासाचा महत्त्वाचा वैचारिक ग्रंथ होता. वयाच्या तिसाव्या वर्षी या इंग्रजी ग्रंथावर सयाजीरावांनी ‘फ्रॉम कैसर टू सुलतान’ या नावाने टीकाग्रंथ लिहिला. या इंग्रजी ग्रंथाचा ‘कैसरकडून सुलतानाकडे’ हा मराठी अनुवाद राजाराम रामकृष्ण भागवतांनी केला. समितीतर्फे प्रकाशित करण्यात येणाºया खंडांमध्ये या दोन्ही ग्रंथांचा समावेश आहे.
हे दोन्ही ग्रंथ महाराष्ट्रातील इतिहास, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्रांंच्या अनेक अभ्यासक-पंडितांपैकी एकाच्याही नजरेस येऊ नये, हे पुरोगामी महाराष्ट्राचे बौद्धिक संचित आहे की हुशारीने मुद्दाम ठरवून केलेली बौद्धिक डोळेझाक तर नाही ना, असा सवाल बाबा भांड यांनी ‘लोकमत’शी केला.
एडवर्ड गिबन यांचा सहा खंडांतील ग्रंथाची सयाजीरावांनी धर्मग्रंथासारखी पारायणे केली. राजारामशास्त्री भागवतांकडे अनुवादाचे काम सोपवले. यात तत्कालीन लेखकांची लेखन अवस्था, मराठीचा अर्थशून्य प्रौढपणा, साध्या व खºया भाषेची गरज, अलीकडचे गद्यमय सारस्वत, भाषा भागीरथी, रूपांतरकाराची मातब्बरी यासंबंधी मुद्द्यांचा परामर्श घेण्यात आला
आहे.
या इंग्रजी ग्रंथाचे मराठी रूपांतर ‘कैसरकडून सुलतानाकडे’ महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीतर्फे प्रकाशित होत आहेत. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे अक्षरधन ही राष्ट्राची संपत्ती आहे.
या ऐतिहासिक सांस्कृतिक वारसाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे राष्ट्रीय सांस्कृतिक कार्य ओळखून महाराष्ट्र शासनाने महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशनाचे काम सुरू केले आहे, असेही बाबा भांड यांनी सांगितले.

एकशे दहा वर्षांमध्ये दखल नाही...
एडवर्ड गिबन हा महान इतिहासतज्ज्ञ होता. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी गिबनच्या ‘डिक्लाइन अँड फॉल आॅफ द रोमन एम्पायर’ ग्रंथावर आधारित ‘फ्रॉम कैसर टू सुलतान’ हा टीकाग्रंथ लिहिला. राजारामशास्त्री भागवत यांनी त्याचा मराठीत अनुवाद केला. एकशे दहा वर्षांमध्ये याची इतिहासकार, अभ्यासकांना दखल घ्यावीशी वाटली नाही. सयाजीरावांशी संबंधित खंडांमध्ये एक ग्रंथ इंग्रजी तर एक खंड मराठी अनुवादाचा आहे.
- बाबा भांड, सचिव, महाराजा सयाजीराव गायकवाड
चरित्र साधने प्रकाशन समिती

Web Title: Article of the European culture to be unearthed through volumes, Sayajirao Gaikwad Character Tools publication committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.