न्यायमूर्ती रानडे यांच्यावरील लेखाचा पाठयपुस्तकात समावेश व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:13 AM2021-01-19T04:13:48+5:302021-01-19T04:13:48+5:30

ज्येष्ठ पुरातत्वतज्ञ डॉ.गो.बं.देगलूरकर : रमा-माधव रानडे स्मृती समितीतर्फे न्यायमूर्ती रानडे यांच्या १२० व्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान पुणे : न्यायमूर्ती रानडे ...

An article on Justice Ranade should be included in the textbook | न्यायमूर्ती रानडे यांच्यावरील लेखाचा पाठयपुस्तकात समावेश व्हावा

न्यायमूर्ती रानडे यांच्यावरील लेखाचा पाठयपुस्तकात समावेश व्हावा

Next

ज्येष्ठ पुरातत्वतज्ञ डॉ.गो.बं.देगलूरकर : रमा-माधव रानडे स्मृती समितीतर्फे न्यायमूर्ती रानडे यांच्या १२० व्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यान

पुणे : न्यायमूर्ती रानडे यांनी सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकारणाचा विचार मांडला. अनेक संस्था स्थापन केल्या. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रोत्तेजक महादेव गोविंद रानडे असे म्हणायला हवे. त्यांचे कार्य आजच्या पिढीला माहित होण्यासाठी त्यांच्यावरील लेखाचा कोणत्याही इयत्तेच्या पाठयपुस्तकात समावेश व्हायला हवा, असे मत ज्येष्ठ पुरातत्वतज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.

रमा-माधव रानडे स्मृती समितीतर्फे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या १२० व्या स्मृतीदिनानिमित्त देगलूरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे करण्यात आले. यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ.दीपक टिळक, अविनाश चाफेकर , परशुराम परांजपे आदी उपस्थित होते.

डॉ. देगलूरकर आणि डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते न्यायमूर्ती रानडे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर प्रबोधन पुरुष न्या.महादेव गोविंद रानडे याविषयावर देगलूरकर यांचे व्याख्यान झाले. तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून जपानी भाषेचा प्रचार आणि प्रसार केलेल्या कार्याची दखल घेऊन जपान सरकारने डॉ. टिळक यांना विशेष सन्मानाने गौरविल्याबद्दल समितीतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

डॉ.दीपक टिळक म्हणाले, न्यायमूर्ती रानडे यांनी अनेक समाजोपयोगी संस्थांची उभारणी केली. अशा महापुरुषाचे स्मरण झालेच पाहिजे. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आजही समाजोपयोगी कार्य करीत आहे. त्या संस्थांनी एकत्र येत रानडेंचा विचार अधिक जोमाने पुढे न्यायला हवा.'' शर्वरी लेले यांनी स्वागत गीत सादर केले. श्रद्धा परांजपे यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा जोग यांनी पसायदान सादर केले. प्रार्थना समाजाचे विश्वस्त डॉ.दिलीप जोग यांनी आभार मानले.

Web Title: An article on Justice Ranade should be included in the textbook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.