कलाकारांचे प्रश्न पुढील पंधरा दिवसांत मार्गी लागतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:11 AM2021-07-25T04:11:01+5:302021-07-25T04:11:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रियल दर्जा मिळावा, म्हाडा आणि सिडकोमध्ये कलाकारांना पाच टक्के आरक्षित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मराठी चित्रपट सृष्टीला इंडस्ट्रियल दर्जा मिळावा, म्हाडा आणि सिडकोमध्ये कलाकारांना पाच टक्के आरक्षित घर मिळावे, सर्व जिल्ह्यांमध्ये वृद्ध कलावंत मानधन कमिटी नेमावी, राज्य शासनाच्या सांस्कृतिक कमिटया जाहीर कराव्यात, गेली पाच वर्षे रखडलेले मराठी चित्रपटांचे अनुदान मिळावे, वृद्ध कलावंतांच्या पेन्शनमध्ये जास्तीत जास्त वाढ करावी, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाने राज्याचे सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. कलाकारांचे प्रश्न पुढील पंधरा दिवसांत मार्गी लागतील, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, अभिनेत्री प्रिया बेर्डे, सविता मालपेकर, अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, प्रदेश सचिव मंगेश मोरे ,राज्य समन्वयक संतोष साखरे उपस्थित होते.
------------------------------------------------------------------