अरुण निगवेकर प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:12 AM2021-04-24T04:12:12+5:302021-04-24T04:12:12+5:30
- डॉ. विश्वनाथ कराड, संस्थापक -अध्यक्ष, एमआयटी, पुणे ------------- सर्वांशी आपुलकीने मिळून मिसळून काम करणारे होते. ‘इंडियन सायन्स ...
- डॉ. विश्वनाथ कराड, संस्थापक -अध्यक्ष, एमआयटी, पुणे
-------------
सर्वांशी आपुलकीने मिळून मिसळून काम करणारे होते.
‘इंडियन सायन्स काँग्रेस’ ही त्यांच्या कार्यकाळात व नेतृत्वाखाली झाली होती. ते एक चांगले प्रशासक, शिक्षक, मितभाषी असे व्यक्तिमत्त्व होते. कुलगुरुपदाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी मला मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांचे जाणे ही शिक्षण क्षेत्राची मोठी हानी आहे.
-प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
अलौकिक प्रतिभेचा शिक्षणतज्ज्ञ गमावला आहे. विद्यार्थ्यांप्रती त्यांची आस्था व उच्च शिक्षण प्रणाली व आशय याबाबतचे त्यांचे ज्ञान सखोल होते. त्यांच्या विश्वव्यापी दृष्टिकोनाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला व शिक्षण क्षेत्राला एक उंची प्राप्त करून दिली.
- रवींद्र वंजारवाडकर, संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,
पुणे महानगर