आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आल्याने खाल्ला भाव; प्रति किलो २०० रुपये
By अजित घस्ते | Published: May 6, 2023 06:41 PM2023-05-06T18:41:45+5:302023-05-06T18:41:56+5:30
मागील आठवड्यात २० ते ३० रुपये किलो मिळणारे आले मात्र २०० पर्यत किलो भाव गेला आहे
पुणे: भारतीय खाद्यसंस्कृती जगभरात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. आपल्या रोजच्या आहारातला प्रत्येक पदार्थ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यापैकी रोजच्या आहारात आल्याचा समावेश असेल, तर तुम्ही अनेक आजार दूर ठेवू शकता. म्हणून काही जुने लोक अजून ही रोजच्या आहारात आले सेवन करतात. आले सेवन केल्याने अनेक आरोग्यच्या दृष्टीने फायदेशीर असते. मात्र तेच आले पूर्वी पंधरा दिवसांपूर्वी २० ते ३० रुपये किलो असलेले आले सद्या किरकोळ मध्ये २०० रुपये किलो पर्यत भाव खाल्याने सामान्यांच्या आवाक्यात बाहेर गेले आहे.
मागील आठवड्यात २० ते ३० रुपये किलो मिळणारे आले मात्र २०० पर्यत किलो भाव गेला आहे. सध्या सातारा, औरंगाबाद ,कर्नाटक येथून आवक होते. मात्र यंदा अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. यामुळे आले उत्पादन कमी झाल्याने बाजारात आवक कमी होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात १५० रूपये किलो तर किरकोळ मध्ये सद्या २०० रुपये भाव खाल्ला असल्याने सामान्य माणसाच्या आवाक्यात बाहेर गेले आहे.
आरोग्यासाठी फायदेशीर मसाल्यांपैकी आलं हे सर्वात उपयुक्त मानले जाते. आल्याची पावडर करून, ज्युसमध्ये मिसळून सेवन करण्यासोबतच चहामध्ये घालून किंवा काढा बनवून त्याचा गरम गरम शेक बनवण्यासाठी वापरतात. तसेच खाद्यपदार्थांसोबतच आलं सौंदर्य प्रसाधनांमध्येही वापरले जाते. जेवनात किंवा चहा, काढ्यामध्ये वापरली जाणा-या साम्रगीपैकी आले (आद्रक) एक मानले जाते. त्यामुळे आलेला अनन्य साधारण महत्व आहे.
मार्केटयार्ड बाजारात होलसेल १५० रूपये भाव सुरु
20 किलोच्या 2 हजार पिशव्याची आवक सध्या मार्केटयार्डात बाजारात येत आहे. गेल्या तीन वर्षातून येवढा भाव मिळाला आहे. आल्याची लागवड कमी झाली आहे. सध्या सातारा आल्याला मागणी जास्त आहे. मध्यप्रदेश, लखनऊ, गुजरात, याठिकाणी निर्यात केली जाते. मार्केटयार्ड बाजारात होलसेल १५० रूपये भाव चालू आहे. - शंकर विभुते आले व्यापारी