तब्बल ३४२ सीसीटीव्ही तपासून चोरांना पकडले; ट्रकची चोरी करणारे तीनजण जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 04:19 PM2023-02-14T16:19:57+5:302023-02-14T16:20:02+5:30

पुणे ते औरंगाबादपर्यंत ३४२ सीसीटीव्ही फुटेज तपासून हायवा ट्रक चोरीच्या गुन्ह्याचा उकल पोलिसांनी केला आहे...

As many as 342 CCTVs were checked and thieves were caught; Three people who stole a truck were jailed | तब्बल ३४२ सीसीटीव्ही तपासून चोरांना पकडले; ट्रकची चोरी करणारे तीनजण जेरबंद

तब्बल ३४२ सीसीटीव्ही तपासून चोरांना पकडले; ट्रकची चोरी करणारे तीनजण जेरबंद

googlenewsNext

आव्हाळवाडी (पुणे) : वाघोली (ता. हवेली) परिसरातून हायवा ट्रक चोरून त्याचे तुकडे तुकडे करून स्क्रॅप करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीतील तिघांना गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ने कसून तपास करून अटक केली आहे. अटक केलेल्या अट्टल चोरट्यांवर महाराष्ट्रातील विविध पोलिस ठाण्यात वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पुणे ते औरंगाबादपर्यंत ३४२ सीसीटीव्ही फुटेज तपासून हायवा ट्रक चोरीच्या गुन्ह्याचा उकल पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीतून चोरी गेलेला टाटा कंपनीचा हायवा ट्रक याचा समांतर तपास करत असताना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ पथकातील पोशि अमोल सरतापे व पोशि विनायक येवले यांनी मिळून अष्टापूर फाटा लोणीकंद येथून ते औरंगाबाद येथील पैठणपर्यंत एकूण ३४२ ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून पाचोड गाव येथून लक्ष्मण बाबूराव गाडे (वय ३८) यास अटक केली. त्याच्या मालकीच्या शेतातून ट्रकचे तुकडे करण्यासाठी लागणारे गॅस कटर व इतर साहित्य तसेच सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या हायवा ट्रकची नंबर प्लेट व डिसेंबर महिन्यात चोरीस गेलेला आणखी एका हायवा ट्रकची नंबर प्लेट जप्त केली. चोरीच्या दोन्ही हायवा ट्रकचे गुन्हे उघडकीस आणले. लक्ष्मण गाडे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यास ट्रक चोरीच्या गुन्ह्यात मदत करणारे साथीदार फिरोज मकबुल शेख (वय २६, व्यवसाय भंगार दुकान, आंबड, जालना), महाजन दगडुसिंग संदुर्डे, (वय ४६, आंबड, जालना) यांचे मदतीने चोरीच्या हायवा ट्रकचे तुकडे तुकडे करुन, स्क्रॅप केला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. फिरोज शेख यास त्याच्या राहत्या घरून अटक केली आहे, तर महाजन संदुर्डे यास पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेरून अटक केली आहे.

अटक केलेल्या तिघांकडून चोरीस गेलेल्या हायवा ट्रकचे तुकडे तुकडे करून स्क्रॅप केलेला सर्व मुद्देमाल जालना येथून पंचनाम्याने ताब्यात घेतला आहे. याच गुन्ह्यामधील शाहरुख मकबूल शेख, नकीम मन्सुर सय्यद, अस्लम आबिद्दीन सय्यद, सूर्यवंशी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), जीतू शर्मा, रजीउद्दीन सय्यद हे फरार असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील पंधरकर, सहा. पोलिस निरीक्षक विवेक पडावी, पोलिस अंमलदार अमोल सरतापे, विनायक येवले, संदीप येळे यांनी केली आहे.

Web Title: As many as 342 CCTVs were checked and thieves were caught; Three people who stole a truck were jailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.