पुण्यातील तब्बल ४७८ वाडे धोकादायक; महापालिकेकडून वाड्यांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 10:39 AM2022-07-07T10:39:36+5:302022-07-07T10:39:42+5:30

पुण्यातील वाड्यांची दुरावस्था पुणेकरांसाठी ठरेल संकट

As many as 478 old house in Pune are dangerous Notice to Municipal Corporation | पुण्यातील तब्बल ४७८ वाडे धोकादायक; महापालिकेकडून वाड्यांना नोटीस

पुण्यातील तब्बल ४७८ वाडे धोकादायक; महापालिकेकडून वाड्यांना नोटीस

googlenewsNext

पुणे : सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्यासह पुणे शहरात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतोय. या पावसात जे धोकादायक वाडे आहेत, ते अचानक पडू नये, या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या वतीने शहरातील तब्बल ४७८ वाड्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. तर पावसाळ्याच्या आधी शहरातील विविध भागातील जे अतिधोकादायक वाडे आहे, अशा एकूण ३८ हून अधिक वाडे पाडण्यात आले आहेत. महापालिकेचे बांधकाम विकास विभाग अधीक्षक अभियंता सुधीर कदम यांच्याशी लोकमतने बातचीत केल्यावर त्यांनी ही माहिती दिली. 

यंदाच्या पावसाळ्यात शहरातील जवळपास ४७८ धोकादायक वाडे आणि इमारती आहेत.  ज्यांना पुणे महापालिकेच्या वतीने शासनाच्या नियमानुसार सी १, सी २ आणि सी ३ अशा तीन भागात नोटीस बजावण्यात आली आहे. सी १ मध्ये जे अतिधोकादायक २८ वाडे होते, ते सर्वच्या सर्व वाडे हे पाडण्यात आले आहे. तर सी २ मध्ये ३१६ वाडे होते, त्यामधील जे ११ अतिधोकादायक वाडे होते ते देखील पाडण्यात आले आहे. तर सी ३ मधील १३४ वाड्यांपैकी ९ वाडे हे पाडण्यात आले आहे. पुणे महापालिकेच्या वतीने यंदाच्या पावसाच्या आधी शहरातील एकूण ३८ अतिधोकादायक वाडे हे पाडण्यात आले आहेत. 

शहरात सध्या पाऊस जोर धरतोय... 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसामध्ये दरवर्षी शहरात काही जुन्या इमारतींच्या भिंती किंवा काही भाग कोसळण्याचे प्रकार घडतात.  पावसाळ्यात धोकादायक इमारती, वाडे पडून होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी पालिकेची धोकादायक इमारती उतरवण्याची खास मोहीम राबविण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात सीमाभिंती आणि जुन्या इमारती कोसळून होणारी जीवितहानी लक्षात घेऊन सीमाभिंती आणि जुन्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. यावर्षी सुद्धा सर्वेक्षण झाल्यावर या पावसाळ्यात शहरातील एकूण ४७८ वाड्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत.

Web Title: As many as 478 old house in Pune are dangerous Notice to Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.