खेड शिवापूर येथे तब्बल ५५ लाखांचा गुटखा जप्त; राजगड पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 10:36 AM2023-04-03T10:36:54+5:302023-04-03T10:37:07+5:30
कारवाईत शासनाकडून बंदी घालण्यात आलेल्या गुटखा, पान मसाला यांनी भरलेली काही पोती व बॉक्स आढळून आले
खेड-शिवापूर (वार्ताहर) : रविवारी पहाटे राजगड पोलिसांनी केलेल्या छापेमारीमध्ये श्रीराम नगर बांडेवाडी हद्दीतील व शिंदेवाडी हद्दीतील दोन गोडाऊनमध्ये सुमारे 55 लाख 62 हजार रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार राजगड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांच्या संयुक्त कारवाईमध्ये श्रीराम नगर हद्दीतील एका गोडावून मध्ये शासनाकडून बंदी घालण्यात आलेल्या गुटखा, पान मसाला यांनी भरलेली काही पोती व बॉक्स आढळून आले. त्याच बरोबर दुकानदारा कडे सखोल चौकशी केली. संबंधित दुकानदाराचे शिंदेवाडी तालुका भोर जिल्हा पुणे या गावचे हद्दीमध्येही एका पत्र्याच्या शेडमध्ये अशाच प्रकारचा माल लपवून ठेवण्यात आला असल्याचे माहिती समोर आली. त्या ठिकाणीही पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली. या कारवाईमध्ये सुमारे 55 लाख 62 हजार 912 रुपये किमतीचा पान मसाला, गुटखा, सुगंधी मसाला,अश्या प्रकारचे बंदी असलेले साहित्य असलेले बॉक्स आढळून आले. संबंधित मुद्देमाल पंचनामा करून तात्काळ जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी रमेश चौधरी सध्या (रा. श्रीरामनगर तालुका हवेली) याला अटक करण्यात आली आहे.
राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ अधिकारी अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पो. ह. संतोष तोडकर , राहुल कोल्हे, महादेव शेलार, सागर गायकवाड, अजित भुजबळ, यांच्या पथकाने ही कामगिरी केली या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसारे हे करत आहेत.