गुंतवणुकीच्या बहाण्याने सात जणांना तब्बल ६१ लाखांचा गंडा; सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ होतीये, काळजी घ्या...
By भाग्यश्री गिलडा | Published: April 12, 2024 04:57 PM2024-04-12T16:57:06+5:302024-04-12T16:57:30+5:30
पुण्यातील चार वेगवेगळया घटनांमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सात जणांची तब्बल ६१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे
पुणे : मागील काही दिवसात सायबर गुन्हेगारीत प्रचंड वाढ होत असून लाखाे रुपये दरवर्षी सायबर चाेरटे लंपास करत आहेत. चार वेगवेगळया घटनांमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सात जणांची तब्बल ६१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. ११) सिंहगड, लाेणीकंद आणि चंदननगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आल्या आहेत.
पहिल्या घटनेमध्ये, माणिकबाग भागात राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ७ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२३ यादरम्यानच्या काळात सायबर चोरट्यांनी टास्क पूर्ण करून भरघोस नफा मिळवण्याचे आमिष दाखवून १ लाख ५८ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी सिंहग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, खराडी रिसरात राहणाऱ्या विशाल बबन शिरसाट (वय-३२) याच्यासह इतर साथीदार राकेश रंजन, शतीश राजेंद्रन, कुणाल रंजन, काेमल ज्ञानेश्वर भाेसले यांना अनाेळखी व्यक्तीने प्रथम व्हाॅटसअपवर संर्पक साधत पार्ट टाइम जाॅब देण्याचे अमिष दाखवले. त्यानंतर टेलीग्रामद्वारे त्यांना जाेडून घेत त्यांना विविध माेबाईल क्रमांकद्वारे संर्पक करुन त्यांना लिंक पाढवून त्यांच्या टास्क पूर्ण करण्यास सांगितले. त्यांची एकूण २२ लाख ९० हजार रुपये पाठवण्यास भाग पाडून फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत चंदननगर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाख करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील करत आहेत.
तिसऱ्या घटनेत अरुणकुमार कृष्णकुमार (वय- ३२) या खराडी येथील तरुणाने चंदनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पार्ट टाईम जाॅब करण्या संर्दभात गुगल रिव्हयुव टास्क व क्रिप्टाेकरन्सी प्लॅटफाॅर्म संर्दभातील वेलफेअर टास्क अशाप्रकारचे टास्क पूर्ण करुन जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. टास्क पूर्ण करण्यास सांगून एकूण १३ लाख ६५ हजार रुपये पाठवण्यास भाग पाडले. तक्रारदार यांनी पैसे परत मागितले असता, आरोपींनी ३५ टक्के रक्कम नफ्यावर भरावी लागेल त्यानंतरच पैसे भेटतील नाहीतर अकाऊंट फ्रीज हाेईल असे सांगत फसवणूक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड करत आहेत.
लाेणीकंद परिसरात वाघाेली येथे राहणाऱ्या सचिन रघुनाथ पिसे (वय-३२) या तरुणाला अज्ञात व्यक्तीने संर्पक करुन टास्क जाॅब मध्ये माेठया प्रमाणात फायदा हाेईल असेा सांगितले. त्यात गुंतवणुक करण्यास सांगून विविध बँक खात्यात एकूण १४ लाख ९९ हजार रुपये हस्तांतरित करण्यास सांगून, काेणत्याही प्रकारचा परतावा न देता फसवणूक केली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सीमा ढाकणे करत आहेत.