Pune Corona News: शहरात शुक्रवारी तब्बल ८ हजार २०० जण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 08:57 PM2022-01-28T20:57:02+5:302022-01-28T21:01:38+5:30
तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ३०.७२ टक्के इतकी आहे
पुणे : शहरात शुक्रवारी दिवसभरात १० हजार ९८० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ हजार ३७४ जण बाधित असल्याचे आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत ही टक्केवारी ३०.७२ टक्के इतकी आहे. दिवसभरात ८ हजार २०० जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रुग्ण संख्या ३६ हजार ३४० झाली असून, आज १० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ८८ जणांवर व्हेंटिलेटरवर, तर ३५८ जणांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी ३.७३ टक्केच रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहरात आत्तापर्यंत ४३ लाख ४ हजार ६१० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ६ लाख २८ हजार ५८ जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील ५ लाख ८२ हजार ४९७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार २२१ जण दगावले आहेत.