नोकरी करणे पसंत नसल्याने सुनेला घरात कोंडले; दोन दिवसांनी पोलिसांनी केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 10:18 AM2022-12-26T10:18:41+5:302022-12-26T10:18:49+5:30

दोन दिवस वाट पाहिल्यानंतर महिलेने माहेरी फोन करून झालेला प्रकार सांगितल्यावर ते पोलिसांना घेऊन आले

As she did not like to work her daughter-in-law was locked in the house After two days, the police released him | नोकरी करणे पसंत नसल्याने सुनेला घरात कोंडले; दोन दिवसांनी पोलिसांनी केली सुटका

नोकरी करणे पसंत नसल्याने सुनेला घरात कोंडले; दोन दिवसांनी पोलिसांनी केली सुटका

googlenewsNext

पुणे: माहेराहून सासरी परत आलेल्या सुनेला घरात कोंडून पती व सासू-सासरे निघून गेले. अखेर दोन दिवसांनंतर पोलिसांनी दरवाजा तोडून सुनेची सुटका केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी पती आकाश रणवरे (वय ३१), सासरे प्रफुल्लाचंद्र रणवरे (६०) आणि सासू स्मिता रणवरे (६०, रा. प्रतीकनगर, येरवडा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका २७ वर्षांच्या महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहितीनुसार, फिर्यादी महिला एका हॉस्पिटलमध्ये काम करीत होत्या. त्यांचे २९ मे २०२२ आकाश रणवरे याच्याबरोबर लग्न झाले. सासू, सासऱ्याला सुनेने नोकरी करणे पसंत नसल्याने तिला नोकरी सोडायला लावली. यानंतर आकाश याने काही दिवसांसाठी पत्नीला माहेरी आणून सोडले. परंतु, यानंतर आम्ही तुमच्या मुलीला घटस्फोटाची नोटीस पाठविणार आहोत. मुलीला इकडे पाठवू नका असे फोन करून सांगितले. हे समजल्यावर फिर्यादीला धक्का बसला. तिला सासरी नांदायचे असल्याने त्या १८ डिसेबरला सकाळी सासरी आल्या. आकाश याने तू इथे कशाला आलीस तुझे घर नाही असे सांगून पोलिसांना बाेलावले. पोलिसांनी त्यांना समजावून सांगितले. पोलिस गेल्यानंतर पती, सासू, सासरे यांनी तिला घरात कोंडून बाहेरून कुलूप लावून निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते परत आले. त्यांनी कपडे भरून घेऊन तिला पुन्हा घरात कोंडून निघून गेले. दोन दिवस वाट पाहिल्यानंतर महिलेने माहेरी फोन करून झालेला प्रकार सांगितला. तेव्हा २२ डिसेबरला रात्री महिलेचे वडील पोलिसांना घेऊन आले. पोलिसांनी घराचे लॉक तोडून तिला घराबाहेर काढले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: As she did not like to work her daughter-in-law was locked in the house After two days, the police released him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.