असाही रायगड बोलतो..! वयोवृद्ध इतिहासप्रेमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 03:44 AM2018-01-01T03:44:22+5:302018-01-01T03:44:53+5:30

रायगड शिवाजीमहाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून आपल्याला प्रचलित आहे. या गडावर पर्यटक, इतिहासपे्रमी अशा विविध भूमिकेतून लोक जात असतात. सध्या गडावर असलेले भग्न अवशेष पाहून आपण परत फिरतो.

 Asahi Raigad speaks ..! Veteran historians | असाही रायगड बोलतो..! वयोवृद्ध इतिहासप्रेमी

असाही रायगड बोलतो..! वयोवृद्ध इतिहासप्रेमी

Next

- दीपक कुलकर्णी
पुणे : रायगड शिवाजीमहाराजांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून आपल्याला प्रचलित आहे. या गडावर पर्यटक, इतिहासपे्रमी अशा विविध भूमिकेतून लोक जात असतात. सध्या गडावर असलेले भग्न अवशेष पाहून आपण परत फिरतो. परंतु, रायगड हा एकच गड एखाद्या व्यक्तीचा चाळीस वर्षे संशोधनाचा विषय होतो. त्यानिमित्ताने २०० च्यावर गडाला भेटी दिल्या जातात. वयाच्या ८२ व्या वर्षीदेखील हा माणूस रायगडावर तीन-तीन दिवस ऊन, वारा, पाऊस, थंडी यांचा विचार न करता मुक्काम करत संशोधनाचे हाती घेतलेले व्रत सांभाळतो आहे.
२०१४ मध्ये कर्करोगाच्या निदानाच्या आॅपरेशननंतर दोनशेतल्या फक्त वीस भेटी ध्येयवेडा माणूस रोप वेमार्गे देतो. आपल्या विश्ववंद्य छत्रपती शिवाजीमहाराजांचा सत्य इतिहास रायगडाला भेट देणाºया पर्यटकांपर्यंत पोहोचला पाहिजे हा त्याचा एकमेव ध्यास... अशा रायगडमहर्षीचे नाव ज्येष्ठ वास्तुतज्ञ गोपाळ चांदोरकर!
आतापर्यंत रायगडावर तीन पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. नुकतेच चांदोरकरांचे बुकमार्क प्रकाशनाने ‘श्रीमद् रायगिरी’ हे रायगडाविषयीचे चौथे पुस्तक इतिहासप्रेमींच्या भेटीला आले आहे. या पुस्तकात रायगडावरील तटबंदी, बालेकिल्ला, बुरुज, मंदिरे, हेरखात्याच्या जागा, अष्टप्रधान वाडे, पाणीपुरवठा व्यवस्था, खजिना महाल, सराफ यांचा सखोल वास्तुरचना तज्ज्ञांच्या नजरेतून अभ्यास करत या स्थळांची छायाचित्रे रेखांकन केले आहे. या सर्व गोष्टींचा खुलासेवार संदर्भ दिले आहेत. प्रचलित समजांमधील हत्तीखाना नव्हे, तर महिला नाट्यमंडप, पर्जन्यमापक यंत्र, सूर्यघटिका यंत्र, व्हॅट पाईप काऊलसह शौचालये, लिखाणासाठी बोरु गवताची लागवड, जमिनीखालचा पाईपलाईनद्वारे केलेला पाणीपुरवठा, आणि सांडपाण्यासंबंधीच्या कामाचा उत्तम नमुना रायगडावर दिसतो. आगामी काळात आणखी काही पुस्तकांच्या माध्यमातून रायगडाची वैैविध्यपूर्ण माहिती वाचकांच्या समोर येणार आहे. चांदोरकर म्हणाले, १९८० मध्ये शिवाजीमहाराजांच्या पुण्यतिथीला रायगडावर गेलो होतो. त्या वेळी तेथील गाइडने गडासंबंधी भग्न अवशेषांबद्दल प्रचलित माहिती देण्यास सुरुवात केली.

रायगडाची नवी ओळख
रायगडावरील बाजारपेठ, राणीवसा, दारु कोठार, रत्नशाळा, गजशाळा यांच्याविषयी मतभिन्नता आढळते. चांदोरकर यांनी या सर्व वास्तुंचे केलेले वस्तुस्थिती, इतिहास आणि तर्क यांचे आधारे निराकरण केले आहे. प्रचलित नावे कशी अग्राह्य आहे ते फक्त न सांगता त्या वास्तुंचा उपयोग सांगून त्यांची ओळख पटवून दिली आहे. माझ्या दृष्टीने लेखकाचे रायगड नगररचनेसंबंधीचे योगदान महत्वाचे व लक्षणीय आहे.
- गो. बं. देगलूरकर

संशोधनातून नवे संदर्भ
इतिहासातील प्रचलित गोष्टींंविरुद्ध बोलणे तसे कठीण असते. पण, पुरात्तत्वीय खात्याच्या चौकटीत राहून संशोधनाचे कार्य करत आलो आहे. इतिहास ही एका दिवसात उलगडणारी गोष्ट निश्चितच नाही.काही वर्ष सातत्यपूर्ण प्रयत्न केला तर संशोधनातून इतिहासातील जुन्या गोष्टींचा नव्याने संदर्भ लागतो. त्याप्रसंगी एवढे वर्ष घेतलेली मेहनतीचे सार्थक झाल्याची भावना असते.
- गोपाळ चांदोरकर

Web Title:  Asahi Raigad speaks ..! Veteran historians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.