""आसमानों तक’ या गाण्यावर दहा लाख व्हयूजची मोहोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:38 AM2020-11-22T09:38:36+5:302020-11-22T09:38:36+5:30
‘आसमानों तक’ हे गाणे ३ मिनिट २४ सेकंद इतक्या कालावधीचे आहे. एका जोडप्यावर गाणे चित्रित करण्यात आले आहे. तरुणीची ...
‘आसमानों तक’ हे गाणे ३ मिनिट २४ सेकंद इतक्या कालावधीचे आहे. एका जोडप्यावर गाणे चित्रित करण्यात आले आहे. तरुणीची नोकरी गेल्यामुळे ती खचते. त्यावेळी ‘दुनिया के तानों को रख तू बस कानों तक’ असे सांगत जोडीदार तिला नैराश्यातून बाहेर पडण्याचा रस्ता दाखवतो. सध्या फेसबूक, व्हॉटस अॅपचे स्टेटस, अनेक ग्रूप्स येथे हे गाणे कमालीचे हिट होत आहे.
ेएसडी फिल्म्स आणि स्पंदन आर्टसतर्फे प्रदर्शित झालेले ‘आसमानों तक’ हे गाणे दिग्विजय जोशी यांनी गायले, संगीतबध्द केले आहे. जोशी आणि आकांक्षा स्थळेकर यांच्यावर गाणे चित्रित झाले आहे. समशेर सिंग बेनियाझ यांनी हे गाणे लिहिले आहे. दिग्विजय जोशी यांनी आतापर्यंत १२० हून अधिक गाणी गायली आहेत आणि संगीतबध्द केली आहेत.
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोक-या गेल्या, अनेकांना नैराश्याने घेरले. मात्र, नैराश्यातून बाहेर पडल्यावर नव्या वाटा निश्चितच गवसतात. हाच संदेश ‘आसमानों तक’ या गाण्यातून देण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्यावर आवडीची मोहोर उमटवलेल्या दहा लाख लोकांपैकी दहा जण जरी गाणे ऐकून नैराश्यातून बाहेर येऊ शकले तरी आमच्या कष्टांचे सार्थक झाल्यासारखे वाटेल.
- दिग्विजय जोशी