भोर शहरातील कोरोना चढता आलेख थांबता थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:10 AM2021-04-05T04:10:45+5:302021-04-05T04:10:45+5:30
कोविड सेंटर फुल्ल होत चालले असून भोर शहरात कोरोनाचा चढता आलेख थांबत नसल्यामुळे शहर व तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. ...
कोविड सेंटर फुल्ल होत चालले असून भोर शहरात कोरोनाचा चढता आलेख थांबत नसल्यामुळे शहर व तालुक्यात भीतीचे वातावरण आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रशासनाने सायंकाळी ६ ते सकाळी ६ यावेळेत संचारबंदी घोषित केली असून अत्यावश्यक असलेली मेडीकल, आरोग्य भाजीपाला किराणा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. तर दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. भोर प्रशासनाकडून नियमांची कडक अंमलबाजावणी करण्यात येत आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र तरीही शहरात व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.मागील एक महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.मात्र शहारात व ग्रामीण भागातील गावात नियमांचे पालन न करता कोणत्याही प्रकारचे सुरक्षित अंतर ठेवले जात नाही. त्यामुळे कोरोना कमी होण्याऐवजी वाढत असून भीतीचे वातावरण आहे.भोर शहरात व ग्रामीण भागात एकूण १४९ जण कोरोनाग्रस्त असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.तालुक्यात एकूण २४५६ कोरोनाग्रस्त आहेत. तर उपचारानंतर घरी सोडलेले २२२७ जण आहेत.स्वॅब तपासलेले १५९८६ जण आहेत.आत्तापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे.रथखाना येथील कोविड केअर सेंटरला ७४ रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड हेल्थ केअर सेंटरवर ४७, तर शासकीय आयटीआय येथे १८ असे १४९ जण उपचार घेत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला तर रुग्णांना बेड मिळणे अवघड होणार आहे.
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भोर शहरात व ग्रामीण भागातील गावात कोरोना पॉझिटिव्ह वाढत गेले असून एकूण १४९ जण कोरोना पाॅझिटिव्ह आहेत.३ एप्रिल पासून नियम घालून दिले असून कडक अंमलबजावणी केली जात आहे. रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड हेल्थ केअर सेटरला व्हेंटिलेटर तज्ज्ञ नाही. रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या कोविड हेल्थ केअर सेंटरवर पाच व्हेंटिलेटर आहेत मात्र व्हेंटिलेटर चालवणारे तज्ज्ञ (ऑपरेटर) नाही. त्यामुळे व्हेंटिलेटरच्या रुग्णांना काहीच फायदा होत नाही. उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर केल्याने सर्वसामान्य लोकांना अपघात, सर्पदंश झाल्यास, कुत्रा चावल्यास उपचार मिळत नाही. त्यामुळे लोकांना भोरपासून ९ किलोमीटरवर असलेल्या नेरे किंवा १० किलोमीटरवरील आंबवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जावे लागत आहे.अन्यथा खासगी दवाखान्यात जावे लागत आहे.
भोर शहरात सायंकाळी सहानंतर बंदी असलेली बाजारपेठ फोटो